शिराढोण : मयत नामे- कृष्णा रावसाहेब आघाव, वय 20 रा. वंजारवाडी, ता. बीड जि. बीड, हे दि.16.04.2024 रोजी 02.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 7831 वरुन ढोकीकडे जात होते. दरम्यान मुरुड ते ढोकी रोडवरील ढोराळा गावच्या जवळील रस्त्यावर मोटर सायकल क्र एमएच 13 बीई 5661 चा चालकाने आरोपी नामे- जान्सन सालोमन वॉल्टर, वय 34 रा.सोलापूर जि. सोलापूर यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे रॉग साईडने चालवून कृष्णा आघाव यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात कृष्णा आघाव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच आरोपी नामे- जान्सन वॉल्टर हे स्वत:चे मरणास कारणीभुत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीहरी रावसाहेब आघाव, वय 21 वर्षे, रा. वंजारवाडी ता. बीड यांनी दि.20.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ), सह 184 मोवका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
तुळजापूर : आरोपी नामे-1) प्रशांत किसन गायकवाड, वय 40 वर्षे, रा. उपळा ता.जि. धाराशिव हे दि.20.05.2024 रोजी 20.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल एमएच 25 एजी 4819 ही तुळजापूर लातुर रोड वरीलकृषी महाविद्यालय समोर तुळजापूर येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
उमरगा :आरोपी नामे-1)राम तानाजी अबाचने, रा. भिमनगर हेळवी गल्ली उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव दि.19.05.2024 रोजी 18.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 24 ई 6065 हा आरोग्यनगरी कॉर्नर येथे एनएच 65 रोडवर हैद्राबाद रोउवर डिवायडरच्या दक्षिण बाजूस सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.