धाराशिव : शिवसेना ठाकरे गटाचा युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय संजय ढोबळे याच्या जाचास व त्रासास कंटाळून एका मोलमजुरी करणाऱ्या तरुणाने ढोबळे कॉम्पलेक्समध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सामाजिक कार्याचा आव आणणाऱ्या ढोबळे यांनी एका मजुराचा बळी घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
राहुल श्रीरंग किरदत्त ( वय 34 वर्षे ) रा. दत्तनगर ता. जि. धाराशिव असे या मयत मजुरांचे नाव आहे. किरदत्त याने दि.08.02.2024 रोजी सायंकाळी 16.00 ते 16.30 ते दि. 10.02.2024 रोजी 10.00 वा. सु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ढोबळे कॉम्पलेक्स धाराशिव येथे गळफास घेवून आत्महत्या केली होती,. आनंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याने उलट – सुलट चर्चा सुरु आहे.
राहुल किरदत्त यास बॅकेची नोटीस आल्याने आरोपी नामे-अक्षय संजय ढोबळे, रा.आनंदनगर, धाराशिव यास कॉम्पलेक्सच्या बांधकामावरील कामाचे पैसे मागितले असता नमुद आरोपींने पैस देण्यास टाळाटाळा करुन नेहमी वाद विवाद घालून मानसिक त्रास दिल्याने नमुद आरोपीच्या जाचास व त्रासास कंटाळून राहुल किरदत्त याने आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीरंग भगवान किरदत्त, वय 65 वर्षे, रा. दत्तनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.28.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम-306 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.