• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

एपीआय माळाळे आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करा

माळाळे कुटुंबीयांसह विविध संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

admin by admin
October 13, 2023
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
एपीआय माळाळे आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

 सोलापूर, –  नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे धाराशिवचे सुपुत्र आनंद माळाळे यांंनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करून दोषींवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी लेखी मागणी माळाळे यांच्या कुटुंबीयांसह समाजबांधवांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

धाराशिव येथील रहिवाशी असलेले आनंद प्रकाश माळाळे हे मागील 25 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात विविध पदावर सेवेत होते. माळाळे हे आपल्या कुुटुंबीयांसह सोलापूर येथे वास्तव्यास होते. मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांची नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बदली झाली होती. मात्र वरिष्ठांकडून त्यांना वेळोवेळी प्रशासकीय मदत मिळाली नाही. त्यांना तपासासाठी अनेक गुन्हे देण्यात आले होते. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असणारे व मुदतीत दोषारोप पाठविणे आवश्यक असणार्‍या अनेक गुन्ह्यांचा तपास त्यांना देवून वेळेची मर्यादा घालून देण्यात आली.

वरिष्ठांनी माळाळे यांना कुठलीही मदत न करता, गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा व्हावा, दिरंगाई व्हावी, आरोपीला मदत होईल, असे काम केले. वरिष्ठांनी विनाकारण जाणीवपूर्वक व हेतुपूर्वक जातीय द्वेष मनात ठेवून त्यांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.
माळाळे हे मागील सहा महिन्यांपासून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या या मानसिक त्रासामुळे त्रस्त होते. एक महिन्यापूर्वी माळाळे यांचा अपघात झाल्याने ते वैद्यकीय रजेवर होते. या काळात वरिष्ठांनी वेळोवेळी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी माळाळे यांच्यावर दबाव आणला. यातून होणार्‍या त्रासाला कंटाळून त्यांनी शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी पहाटे सोलापूर येथील राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

याप्रकरणी आनंद माळाळे यांच्या पत्नी किंवा मुलगा यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. माळाळे यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून पोलीस अधीक्षक हानपुडे-पाटील, पोलीस निरीक्षक नरूटे, श्री. कासेकर व इतर दोष अधिकारी, कर्मचार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर वंदना माळाळे, रंजना माळाळे, यशवंत माळाळे, मयूर माळाळे, राजाभाऊ ओव्हाळ, विशाल शिंगाडे, रवी माळाळे, पुष्पकांत माळाळे, राजाभाऊ ओव्हाळ , संजय माळाळे, सिध्दार्थ बनसोडे, संदीप बनसोडे, संघटनेचे पदाधिकारी व इतरांची स्वाक्षरी आहे.

Previous Post

आरोग्य केंद्र, उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याचा आदेश रद्द करा अन्यथा आंदोलन

Next Post

माजी आ. विजयराज शिंदे यांचा अपघात, की घातपाताचा प्रयत्न ?

Next Post
माजी आ. विजयराज शिंदे यांचा अपघात, की घातपाताचा प्रयत्न ?

माजी आ. विजयराज शिंदे यांचा अपघात, की घातपाताचा प्रयत्न ?

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026

Recent Posts

  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!