नळदुर्ग – नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामतीर्थ शिवार येथे सोयाबीन काढणीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली तक्रार
आरोपी नामे-रशीद महेबुब पाशा जहागीरदार, सईदा सफदर जहागीरदार,मेहजबीन अफजल कमाले, आसरा सादीक जहागीरदार,सय्यद सफदर साबेर खय्युमद्दीन जहागीरदार,अन्वर महेबुब पाशा जहागीरदार, फरखान रशीद जहागीरदार, अब्दुला उलुम काझी, कैफ सादीक जहागीरदार,मुस्ताक महापाशा जहागीरदार, रेहाना मुस्ताक शेख सर्व रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.10.10.2024 रोजी 14.30 वा. सु. नळदुर्ग येथील रामतीर्थ शिवार येथे फिर्यादी नामे-संतोष रामचंद्र मुळे, वय 40 वर्षे, रा.मराठा गल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने सोयाबीन काढ्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संतोष मुळे यांनी दि.11.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),352, 351(2)189(2), 191(2), 191 (3) 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसरी तक्रार
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-संतोष राम मुळे,कुलवंत बलभिम मुळे,जयवंत बलभिम मुळे,नेनु राम मुळे,विवेक व्यंकट मुळे, मुकेश लक्ष्मण मुळे, बलभिम गोपीनाथ मुळे,सुभेद्रा बलभिम मुळे, राम गोपीनाथ मुळे, सुरेखा लक्ष्मण मुळे,अजित लक्ष्मण मुळे,महेश लक्ष्मण मुळे,संध्या संतोष मुळे, सर्व रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.10.10.2024 रोजी 14.30 वा. सु. नळदुर्ग येथील रामतीर्थ शिवार येथे फिर्यादी नामे- सय्यद सफदर साबेर खय्युमद्दीन जहागीरदार, वय 43 वर्षे, रा.अक्कलकोट रोड नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने सोयाबीन काढ्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी विळा, दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सय्यद सफदर साबेर खय्युमद्दीन जहागीरदार यांनी दि.11.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),352, 351(2)189(2), 191(2), 191 (3) 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.