तामलवाडी: तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करताना दोघांना अटक करण्यात आली आहे. शिवशंकर शेषराव बिराजदार (५०, रा. शंभो उंबरगा, ता. उदगीर, जि. लातुर) आणि केशव दत्तात्रय राजे (४०, रा. सय्यदपुर, ता. देवणी, जि. लातुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता तामलवाडी येथील टोल नाक्याजवळ आरोपींनी आयशर क्रमांक एमएच १२ आरएन ६००८ मध्ये १० जर्सी गायी आणि आयशर क्रमांक एमएच १४ जीडी १८४८ मध्ये ७ जर्सी वासरे कोंबून भरले होते. जनावरांना दाटीवाटीने कोंबण्यात आले होते आणि त्यांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले.
याप्रकरणी तामलवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंद कायदा कलम 11 (1) (के) 5 (ब) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 83,177 मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला आहे.