तामलवाडी : आरोपी नामे-1) महादेव प्रभाकर वडणो, वय 42 वर्षे, रा. माळुंब्रा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.15.06.2024 रोजी 11.10 वा.सु. सौरउर्जा प्लॅटच्या समोर दहीवडी शिवार मार्डी ते काटी रोडवर छोटा हत्ती क्र एमएच 12 एफडी 1253 वाहनात गोवंशीय जनावरे बांधून त्यांना पुरेसी हालचाल करता येणार नाही अशा रितीने छळ करुन त्यांची वाहतुक करताना तामलवाडी पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. व सदर जणावरे शिवनंदी गोशाळा सुरतगाव येथे जमा केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्रणी संरक्षण अधिनियम कलम 5(बी), प्राण्याचा छळ प्रतिबंध कायदा कलम 11(1)(के) मोवाका कलम 83, 177 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
ढोकी : आरोपी नामे-श्रीरंग कल्लाप्पा चव्हाण, रा. राजेश नगर ढोकी, माया छगन काळे, छगन सरदार काळे, दोघे रा जयभवानी नगर ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि. 15.06.2024 रोजी 14.00 वा. सु. ढोकी पेट्रोलपंप चौक येथे फिर्यादी नामे-रंगा बिरु शिंदे, वय 55 वर्षे, रा. कावळेवाडी शिवार ता. जि. धाराशिव यांना आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रंगा शिंदे दि.15.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.