• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुरुममध्ये शाळेत शिक्षकाला मारहाण, गुन्हा दाखल

admin by admin
September 23, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम – येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेत एका शिक्षकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. नुरअहमद पिरअहमद कानकुर्ती (५४) या शिक्षकाला रजिस्टरवर सही घेण्याच्या कारणावरून नसीर नजीर कुरेशी, जैनबी नसीर कुरेशी, रुबाबी अत्तार, इब्राहीम सय्यद कुरेशी, मशाक इबृराहीम कुरेशी, सय्यद इब्राहीम कुरेशी आणि इतर एका इसमाने लाथाबुक्क्यांनी, खुर्ची आणि काठीने मारहाण केली. या घटनेत कानकुर्ती हे जखमी झाले असून त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

या प्रकरणी कानकुर्ती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुरुम पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 189(2), 191(2), 190, 352,351(2)(3)  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाळींब गावात वृद्ध महिलेवर क्रूर हल्ला, गुन्हा दाखल

उमरगा –  तालुक्यातील दाळींब गावात एका वृद्ध महिलेवर क्रूर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. 66 वर्षीय पार्वती मारुती लामजणे यांना 18 सप्टेंबर रोजी रात्री शेतात मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अनिल शंकर मुळे आणि समर्थ अनिल मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्वती लामजणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना शेतात मारहाण केल्याबद्दल विचारणा केली. यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. तसेच, आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. पार्वती लामजणे यांनी 22 सप्टेंबर रोजी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अनिल शंकर मुळे आणि समर्थ अनिल मुळे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

उमरग्यात आर्थिक वादातून मारहाण, गुन्हा दाखल

उमरगा – तालुक्यातील मातोळा येथे दि. २१ सप्टेंबर रोजी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर बाबु गायकवाड, सुरज परमेश्वर गायकवाड, दत्तु बाबु गायकवाड आणि प्रथमेश दत्तु गायकवाड या चौघांनी दिगंबर कोंडीबा भोसले यांच्यावर आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच, त्यांना सळईने मारहाण करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर दिगंबर भोसले यांनी २२ सप्टेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिवमध्ये शेतीच्या वादातून मारहाण, गुन्हा दाखल

धाराशिव –  तालुक्यातील आळणी येथे शेतीच्या वादातून एका 75 वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र रावसाहेब निंबाळकर याने 19 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आळणी शिवारातील शेत गट क्रमांक 392 मध्ये फिर्यादी रावसाहेब शंकर निंबाळकर (वय 75) यांना शेतीच्या वादातून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर फिर्यादी रावसाहेब निंबाळकर यांनी 22 सप्टेंबर रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेंद्र निंबाळकर विरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

आरोग्य मंत्री सावंत साहेब, हे वागणे बरे नव्हे !

Next Post

धाराशिव काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’चा गोंधळ: चव्हाण समर्थकांच्या घरवापसीवर जिल्हाध्यक्ष पाटील नाराज!

Next Post
धाराशिव काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’चा गोंधळ: चव्हाण समर्थकांच्या घरवापसीवर जिल्हाध्यक्ष पाटील नाराज!

धाराशिव काँग्रेसमध्ये 'घरवापसी'चा गोंधळ: चव्हाण समर्थकांच्या घरवापसीवर जिल्हाध्यक्ष पाटील नाराज!

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!