परंडा – भूम तालुक्यातील आंतरगाव येथील एका विद्यालयातील शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून शिक्षकाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली आहे.
धनंजय शिंदे (वय ४०), असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, तो मागील वर्षभरापासून संबंधित विद्यार्थिनीला व्हाट्सअॅपवरून अश्लील संदेश पाठवत होता. तसेच, आपण दोघे लग्न करू, असे वचन देत विद्यार्थिनीवर दबाव आणत होता.
विद्यार्थिनीने आपल्या जबाबात हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला, त्यानुसार परंडा पोलीस ठाण्यात धनंजय शिंदे याच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपी शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे.