कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत धारुर तालुक्यातील जहागीर मोहा येथील रहिवासी सुनिल प्रभाकर राठोड यांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्रमांक MH 44 V 4119) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 ते 7 या वेळेत घडली. मोटरसायकलची किंमत अंदाजे 20,000 रुपये आहे. राठोड यांनी 3 ऑक्टोबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
वाशीत शेतकऱ्याचे सोयाबीन पिक चोरी
वाशी तालुक्यातील कन्हेरी येथील शेतकरी अंकुश गोपीनाथ महानवर यांच्या शेतातील 5 क्विंटल सोयाबीन पिक काही जणांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. सोयाबीनची किंमत अंदाजे 22,500 रुपये आहे. ही चोरी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 या वेळेत झाली. याप्रकरणी अंजना महादेव कांबळे, अनिता महादेव हाके, कामीना लाला गोयकर, दैवशाला अगंद ठवरे आणि ठकुबाई ब्रम्हदेव हाके या पाच जणांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.