तुळजापूर: तुळजापूर येथील एका डिलेव्हरी कुरीअर कार्यालयात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातून 60,007 रुपये रोख आणि 75,007 रुपये किमतीचे सीसीटीव्ही उपकरणे चोरून नेली आहेत. पीडित कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तुळजापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 305 (अ), 331 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे- अक्षय कृष्णा विभुते, वय 26 वर्षे, व्यवसाय- डिलेव्हरी कुरीयर ऑफीस मध्ये एटीएन रा.हंगारगा तुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी डिलेव्हरी कुरीयर ऑफीस मध्ये ठेवलेली रोख रक्कम 60,007₹ व सिसिटीव्ही चे डीव्हीआर, एनव्हीआर, हार्ड डिस्क अंदाजे 75,007₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अक्षय विभुते यांनी दि.29.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 305(अ), 331(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा: येरमाळा येथील एका ट्रकमधून 1,47,967 रुपये किमतीचा माल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ट्रक अहमदाबादहून सेलमकडे जात असताना अज्ञात चोरट्यांनी ट्रकचे ताडपत्री फाडून माल चोरून नेल्याची माहिती ट्रकचालकाने दिली. या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे-दिनेश शिवराज गवशेट्टी, वय 39 वर्षे, व्यावसाय खाजगी नोकरी रा. 124/3 रेल्वे लाईन काडादी चाळ सोलापूर यांनी सांगीतले की, गजेंद्र सिंग रा. महाविरसिंह बावडी जि भिलवाडा, राज्यस्थान व सोबत जगुराज लेकराज जाट रा. भिलवाडा राज्यस्थान हे दोघे व्हीआरएल कंपनीची अशोक लिलॅड ट्रक क्र के.ए. 25 एए5385 ही अहमदाबाद गुजरात येथुन व्हिआरएल कंपनीतुन दिवान बेडसीटचे एक सेट,मटेरियल कापड एक गठण, साडी गठण मधील 25 नग, कंपनीचा कॉटन कुर्ता 80 नग, टिशु असलेले कापड गठण असा एकुण 1,47,967₹ किंमतीचा माल घेवून सेलम तामीळनाडू येथे जात होते. दि. 28.06.2024 रोजी 03.00 वा. पुर्वी पारगाव टोलनाका ते येडशी टोलनाका दरम्यान अज्ञात व्यक्तीने ट्रकवर चढून ताडपत्री फाडून ट्रक मधील माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिनेश गवशेट्टी यांनी दि.29.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोनही घटनांचा तपास सुरू असून पोलिस चोरट्यांच्या शोधात आहेत.