तामलवाडी : येथील वडगाव काटी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातून सुमारे तीन लाख 11 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर शिवाजी सपाटे (वय 34) यांच्या फिर्यादीनुसार, ते वडगाव काटी येथे वास्तव्यास आहेत. दि. 8 फेब्रुवारीच्या रात्री 11 ते 9 फेब्रुवारीच्या पहाटे 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी 85 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण 3 लाख 11 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला.
या घटनेची माहिती सपाटे यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 454, 380 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
शक्तीमान रोटरची चोरी, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
बेंबळी – करजखेडा येथील शेत गट नंबर 504 मधून शक्तीमान कंपनीच्या पाच फुटी रोटरची चोरी झाली आहे. रोटरची किंमत अंदाजे 25 हजार रुपये असून, अज्ञात व्यक्तीने 17 डिसेंबर 2024 ते 18 डिसेंबर 2024 दरम्यानच्या काळात चोरी केली.
या प्रकरणी प्रियंका सहदेव पवार (वय 27) यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, पवार यांच्या शेतात ठेवलेला रोटर कोणीतरी अज्ञात व्यक्ती चोरून नेला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.