धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ढोकी, लोहारा, बेंबळी आणि आनंदनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकल, पानबुडी मोटार आणि इतर वस्तूंच्या चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
ढोकी: ढोकी येथील पेट्रोलपंपाजवळील राधिका बारसमोरून अमित व्यंकट परसे यांची ३०,००० रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेली आहे. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता घडली.
लोहारा: लोहारा तालुक्यातील होळी शिवारातील किरण बाळासाहेब जाधव यांच्या शेतातील विहिरीवरून पानबुडी मोटार, केबल आणि स्टार्टर असा १७,५०० रुपये किमतीचा माल चोरीला गेला आहे. ही चोरी २५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ या वेळेत झाली.
बेंबळी: मेडसिंगा येथील अविनाश देविदास जाधव यांची ५०,००० रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल त्यांच्या शेतातून चोरीला गेली आहे. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४५ ते २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ या वेळेत घडली.
धाराशिव : शहरातील वैष्णवी नगरमधील महेशकुमार भिमराव गाढवे यांची ३०,००० रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली आहे. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० ते २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ या वेळेत घडली.
सर्व घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय दंड संहिता कलम ३७९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.