वाशी : आरोपी नामे-स्वप्नील पौळ, अविनाश मोराळे, सागर जगताप, शुभम शिंदे, सर्व रा. तेरखेडा ता. वाशी, स्वप्नील कोकाटे रा. रुई ता. वाशी व इतर 10 ते 12 अनोळखी इसम यांनी दि.23.06.2024 रोजी 05.00 ते 06.00 वा. सु. पारगाव टोलनाका हॉटेल गोधन येथे फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर विजय बनसोडे, वय 28 वर्षे, रा. गिरवली ता. भुम जि. धाराशिव यांना व त्यांचा भाउ योगेश विजय बनसोडे यांना सिगारेट मागण्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,खुर्चीच्या तुटलेला पायाने मारहाण करुन गल्ल्यातील 22,000₹ रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकुण 42,000 ₹ किंमतीचा माल काढून घेवून हॉटेलमधील सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्ञानेश्वर बनसोडे यांनी दि.23.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 327, 324, 323, 427, 504, 506, 143, 147, 148, 149 सह अ.जा.ज.अ.प्र.का. कलम 3(1) (आर) (एस), 3(2)(व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : आरोपी नामे-प्रशांत गुणवंत सोमवंशी, गुणवंत सोपान सांमवंशी, रेश्मा प्रशांत सोमवंशी, मिनाक्षी गुणवंत सोमवंशी, अनुसया प्रसाद सोमवंशी सर्व रा. लोहगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.06.2024 रोजी 15.00 वा. सु. शेत गट नं 210 मध्ये लोहगाव शिवार येथे फिर्यादी नामे- श्रीकांत किसन माने, वय 43 वर्षे, रा. लोहगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी सुनंदा माने यांना नमुद आरोपींनी शेतात पाणी येण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीकांत माने यांनी दि.23.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : आरोपी नामे-विशाल मिठु हरभरे, दादा गोकुळ मुंढे रा. उपळाई ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 22.06.2024 रोजी 09.30 वा. सु. येडेश्वरी मंदीराचे पाठीमागील परिसरात येरमाळा येथे फिर्यादी नामे- मोहित आप्पाराव जगताप, वय 20 वर्षे, रा. मलकापुर ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, दगडाने मारहाण करुन उजवा खांदा फॅक्चर केला. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मोहित जगताप यांनी दि.23.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 325, 323, 504, 506, 34 सह अ.जा.ज.अ.प्र.का. कलम 3(2) (व्हिए), 3 (1) (आर), 3(1)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.