लोहारा – समुद्राळ येथील भाउसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या गेटवर दोन जणांनी एका व्यक्तीला ट्रॅक्टरने कट मारून मारहाण केल्याची घटना १८ डिसेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिमराव विठ्ठलराव डोनगावे (वय ३२, रा. कलदेव निंबाळा) हे १८ डिसेंबर रोजी रात्री साखर कारखान्याच्या गेटजवळून जात असताना विठ्ठल भुरे (रा. समुद्राळ) आणि बलभिम सरवदे (रा. बलसुर) यांनी त्यांच्या मोटरसायकलला ट्रॅक्टरने कट मारला. डोनगावे यांनी याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली.
डोनगावे यांच्या पत्नी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर डोनगावे यांनी १९ डिसेंबर रोजी लोहारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.