उमरगा – ट्रक विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याची घटना उमरगा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पंडीत शिवाजी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडीत शिवाजी मोरे (वय ४६, रा. तलमोड) यांनी त्यांच्या मालकीची टाटा कंपनीची ट्रक क्र. के.ए. ५६-५७९९ ही साहेबलाल रसुल शेख (रा. इस्लामपुर, जि. बिदर, कर्नाटक) आणि विजय उर्फ विजयकुमार शिवाजी जाधव (रा. तुरोरी, ता. उमरगा) यांना ५,८५,७८९ रुपयांना विकली होती.
या व्यवहारात २,५०,००० रुपये आरोपींनी रोख दिले होते आणि उर्वरित ३,३५,७८९ रुपये १२ फेब्रुवारी २०२४ रोजी देण्याचे ठरले होते. मात्र, आरोपींनी वारंवार मागणी करूनही रक्कम न दिल्याने मोरे यांनी उमरगा पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.