• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजाभवानीचं शिखर आणि भक्तांचा राजकीय आखाडा

admin by admin
August 18, 2025
in गोफणगुंडा
Reading Time: 1 min read
तुळजाभवानीचं शिखर आणि भक्तांचा राजकीय आखाडा
0
SHARES
192
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

(धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धो धो पाऊस कोसळतोय. सगळीकडे पाणीच पाणी झालंय आणि शेतकरी काळजीत आहेत. अशाच एका पावसाळी संध्याकाळी, गावच्या पारावरच्या पत्र्याच्या शेडखाली बसून पक्या, भावड्या आणि पेंद्या हातावर तंबाखू मळत आहेत…)


पक्या: (हातावर तंबाखू मळता मळता) च्यायला, एका आभाळानं रडवून ठेवलंय… अन् तिकडं माणसंच आभाळ फाडायला निघालीत!

भावड्या: (काळजीच्या सुरात) खरंय तुझं… या पावसानं पार वाट लावलीय पिकांची. पण तू माणसांचं काय काढलंस मधीच?

पक्या: आरं, माणसांचं संकट त्याहून मोठं हाय. आपल्या तुळजापूरच्या आईभवानीच्या देवळाचं शिखरच पाडणार हाय म्हणे सरकार!

पेंद्या: (तोंडातला तंबाखू थुंकून) काय? शिखर? मंग आई पावसात भिजल की रं! तिला वर पत्र्याचं शेड तरी टाकत्यात का न्हाई?

भावड्या: (पेंद्याच्या डोक्यात टपली मारत) आरं येड्या, शिखर पाडणार म्हणजे काय घरातलं छप्पर हाय व्हय ते? मोठी भानगड हाय ती. तो आपला आमदार हाय ना… राणा पाटील… त्यानं काहीतरी काडी लावलीय.

पक्या: व्हय व्हय! तोच… च्यायला, आधी त्यो ड्रग्ज वाल्यांकडून सत्कार घेतो, मंग आईची तलवार इकडंतिकडं ठेवतो, आता थेट शिखरावरच घाव घालतोय! लय मस्ती आलीय बग त्याला.

भावड्या: पण झालंय काय नेमकं? कोण म्हणालं पाडायचं?

पक्या: आरं, त्या ओमराजेंनी एक ‘फिडो’ (व्हिडिओ) दावलाय. त्यात राणा पाटील स्वतःच्या तोंडानं म्हणतोय, “शिखर पाडावं लागेल.” मंग काय, भाजपवाल्यांची पळापळ झाली. त्यांनी दुसरी ‘फिडो’ आणली अन् म्हणले, “तुम्ही अर्धीच बघितली, ही बगा पुरी…”

पेंद्या: मंग? पुरी ‘फिडो’ बघून काय झालं? शिखर जागच्या जागी हाय का गेलं?

पक्या: (हसून) आरं पुरी बघितली तरी त्यातबी तेच म्हणतोय, “शिखर पाडावं लागेल.” फक्त पुढं मागं चार शब्द जास्त चिकटवलेत! नुसती धुळफेक चाललीय बग.

भावड्या: मंग तो पत्तरकार कायतरी इचारत होता ना? त्याचं काय झालं?

पक्या: व्हय! एकानं बरोबर बोट ठेवलं. त्यो म्हनला, “आरं बाबांनो, फिडो अर्धी असो का पुरी, शिखर पाडायचं का न्हाई तेवढं सांगा की! तुम्ही बाजूने हाय का विरोधात?” तर त्यावर गडी काय म्हणतोय, “हे षडयंत्र हाय… अजून अहवाल यायचा हाय…” च्यायला, सरळ उत्तरच द्यायचं न्हाई.

भावड्या: ह्ये तर तसलंच झालं की… रोग म्हशीला अन् इंजक्शन पखालीला! मूळ मुद्दा सोडून भलतीच बोंबाबोंब.

पेंद्या: सोळाशे कोटी रुपये मंजूर झालेत म्हणत्यात ना विकासाला? मंग त्या पैशात शिखर अजून उंच बांधायचं सोडून पाडायला का निघालेत हे? मला तर वाटतंय, शिखर पाडून तिथं सपाट मैदान करायचं असल… अन् त्या मैदानावर हेलिकॉप्टर उतरायची सोय करायची असल मोठमोठ्या लोकांची!

पक्या: (कपाळावर हात मारून) आरं काहीबी काय तुझं! पण एक खरंय, ह्याच्याआधी चव्हाण मंत्री होते, खपले आमदार होते… कुणी देवळाच्या कारभारात एवढी ढवळाढवळ केली न्हाई. ह्यास्नीच लय किडा हाय.

भावड्या: खरंय तुझं! पैसं खायची नवी जागा दिसली असल. पण एक लक्षात ठेवा… लय फडफड करू नये. आई मागं लागली की आमदाराची आमदारकी अन् भल्याभल्यांची मस्ती एका मिनटात उतरते!

पेंद्या: ते खरंय… आईचा नाद लय वाईट! शिखर पाडलं तर आई खाली उतरून पारावर आपल्या संग बसायला येईल… अन् मंग ह्यास्नी प्रसाद म्हणून आपटल्याशिवाय राहणार न्हाई!

(तिघेही खदाखदा हसतात आणि तोंडाला तंबाखू लावतात.)

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार, नुकसानीचे तातडीने पंचनामे करा: आमदार कैलास पाटलांची मागणी

Next Post

धाराशिव लाइव्हची बातमी ठरली अनाथांचा आधार; पालकमंत्री आणि समाज धावला चिमुकल्यांच्या मदतीला

Next Post
धाराशिव लाइव्हची बातमी ठरली अनाथांचा आधार; पालकमंत्री आणि समाज धावला चिमुकल्यांच्या मदतीला

धाराशिव लाइव्हची बातमी ठरली अनाथांचा आधार; पालकमंत्री आणि समाज धावला चिमुकल्यांच्या मदतीला

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास मंजुरी, डीपीआरचे काम सुरू

July 23, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

धाराशिवजवळ किया सोनेट कारचा भीषण अपघात! डिव्हायडरला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी

July 22, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 22, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!