तुळजापूर : आरोपी नामे-दिपक रामचंद्र पाटील, सोबत मयत नामे- कविता संजय गायकवाड, वय 42 वर्षे, शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर ता. जि. सोलापूर हे दोघे दि 17.11.2023 रोजी दुपारी 04.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 13 ई. बी. 8380 वरुन लातुर तुळजापूर बायपास रोडवरुन सिंदफळ फाटा पांढरे वस्ती येथुन जात होते. दरम्यान दिपक पाटील यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन स्पीड ब्रेकरवर ब्रेक मारल्याने मोटरसायकल खाली पडून अपघात झाला. या आपघातात कविता गायकवाड या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी संजय जयकुमार बुरसे, वय 52 वर्षे, रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर ता. जि. सोलापूर यांनी दि.17.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल
तामलवाडी : जवाहर नगर हिरा मोती टावर विडी घरकुल हैद्राबाद रोड सोलापूर येथील- नरेंद्र सत्यनारायण कोंडा, वय 43 वर्षे यांनी दि. 20.11.2023 रोजी 17.20 वा. सु. आपल्या ताब्यातील क्रुजर क्रं. एम.एच.13 ए.सी. 0817 ही सोलापूर ते तुळजापूर जाणारे एनएच 52 रोडवर वडगाव काटी जाणारे रस्त्याजवळ तामलवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
कळंब : आरोपी नामे-1)अकलाक रशीद शेख, वय 40 वर्षे, रा. ढोकी, ता. जि. धाराशिव यांनी दि.20.11.2023 रोजी 13.45 वा. सु.आपल्या ताब्यातील ॲपे क्र एमएच 24 एल 9849 हा छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आला. तसेच 2)अरुण चंद्रहास गाडे, वय 56 वर्षे, रा. गंभीरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.20.11.2023 रोजी 19.00 वा. सु.आपल्या ताब्यातील चारचाकी क्र एमएच 25 पी. 6766 ही छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
मुरुम : आरोपी नामे-1)शिवराम नागनाथ चव्हाण, वय 31 वर्षे, रा. नळवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.20.11.2023 रोजी 16.15 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे क्र एमएच 25 एम 973 हा येणेगुर बस स्थानक जवळ एनएच 65 रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
उमरगा : आरोपी नामे-1) अकबर हुजुर मुल्ला, वय 38 वर्षे, रा.तलमोड, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.20.11.2023 रोजी 15.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 डब्ल्यु 8977 ही उमरगा चौरस्तायेथे एन. एच 65 सोलापूर हैद्राबाद रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : आरोपी नामे-1) महेश सिद्राम पेटे, वय 28वर्षे, रा.मुदकन्ना गल्ली मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.20.11.2023 रोजी 20.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 14 डी. एल. 4557 ही छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरुम येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.