तुळजापूर : आरोपी नामे-नेताजी नानासाहेब जमदाडे, व सोबत मयत नामे- लताबाई नानासाहेब जमदाडे, वय 55 वर्षे, दोघे रा.कामठा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दोघे दि. 26.04.2024 रोजी 16.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 0062 हिवरुन जात होते. दरम्यान बापु फुलचंद जमदाडे यांचे शेताजवळ कामठा शिवारात आरोपी नामे नेताजी जमदाडे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल रोडवरील खड्ड्यात आदळल्यामुळे मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या लताबाई जमदाडे या खालीपडून गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- चंद्रभागा नानासाहेब जमदाडे, वय 28 वर्षे, रा. कामठा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.13.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : मयत नामे-यासिन महेबुब मुलानी, रा. मंगरुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव, दि.10.05.2024 रोजी 20.30 वा. सु. काक्रंबा गावातील जयभवानी धाब्यासमोर रोडवरुन पायी जात होते. दरम्यान टाटा ट्रेलर क्र एमएच 40 बीजी 7785 चा चालक आरोपी नामे फैजान इकरान खान रा. रहिमाकुली जि. प्रतापगड राज्य उत्तरप्रदेश यांनी त्याचे ताब्यातील टाटा ट्रेलर हा हायगई व निष्काळजीपणे चालवून यासिन मुलानी यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात यासिन मुलानी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नमुद वाहन चालक हा जखमीस उपचार कामी दवाखान्यात घेवून न जाता अपघाताची माहिती न देता पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आसमा सादिक वाडकर, वय 31 वर्षे, रा. ताकविकी ता. जि. धाराशिव यांनी दि.13.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : आरोपी नामे- चांगदेव राजेंद्र हाटकर, रा. जागजी ता.जि. धाराशिव व सोबत मयत नामे-सुवर्णा सुनिल हाटकर, वय 34 वर्षे, रा. जागजी ता.जि.धाराशिव, हे दोघे दि. 11.05.2024 रोजी 20.45 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एयु 7337 हीवरुन पाडोळी आ. येथुन ट्रॅव्हल्सने पुणे येथे जाण्यासाठी जात होते. दरम्यान मेंढा तांड्याजवळ औसा ते धाराशिव रोडवर आरोपी नामे चांगदेव हाटकर यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल रोडवरील खड्ड्यात आदळल्यामुळे मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या सुवर्णा हाटकर या खालीपडून गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुनिल बाबासाहेब हाटकर, वय 37 वर्षे, रा. जागजी ता.जि. धाराशिव यांनी दि.13.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
ढोकी : आरोपी नामे-1) राजेंद्र आत्माराम सगर, वय 40 वर्षे, रा. गोरेवाडी ता. जि. धाराशिव, 2) दादासाहेब गणपत घुगे, वय 37 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव, 3) रमेश गोवर्धन सगर, वय 48 वर्षे, रा. गोरेवाडी ता.जि. धाराशिव हे तिघे दि.13.05.2024 रोजी 18.15 ते 18.45 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे मोटरसायकल क्र एमएच 25 यु 0348, मोटरसायकल क्र एमएच 14 डीबी 5913 व मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 5010 या ढोकी पेट्रोलपंप चौक येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.