धाराशिव : फिर्यादी नामे-आकाश हनुमंत पडवळ, वय 19 वर्षे, रा.उपळा ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 72,000₹ किंमतीची मोटरसायकल क्र एमएच25 बीबी 6246 ही दि.09.05.2024 रोजी 21.00 ते दि. 10.05.2024 रोजी 04.15 वा. सु. आकाश पडवळ यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश पडवळ यांनी दि.13.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भूम : फिर्यादी नामे-सागर विलास काळे, वय 34 वर्षे, रा.पानगाव ता. बार्शी ह.मु. कुसुमनगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची हिरो होंडा प्लस कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए 8817 ही दि.09.05.2024 रोजी 08.00 ते 15.30 वा. सु. सई ॲटोमाबाईल्स नावाचे दुकानासमोरुन गोलाई चौक भुम येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सागर काळे यांनी दि.13.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : फिर्यादी नामे-दिलीप लक्ष्मण सिंदफळे, वय 60 वर्षे, रा. तोरंबा ता. जि. धाराशिव यांचे ताकविकी शिवारात सिंदफळ ॲग्रो प्रोड्युसर पशुखाद्य बनविण्याची कंपनी येथील पत्री शेडच्या मागील बाजूचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 12.05.2024 रोजी 20.00 ते दि. 13.05.2024 रोजी 08.00 वा. सु. उचकटुन आत प्रवेश करुन मका धान्याचे 25 ते 30 कट्टे काळे व पांढरे रंगाचे अंदाजे 60,000₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिलीप सिंदफळे यांनी दि.13.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 461 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.