• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर नगरपरिषद: पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला केराची टोपली! महंतांना डावलून ड्रग्ज आरोपीला उमेदवारी

 'ड्रग्जचा खरा सूत्रधार राणा पाटीलच' - खा. ओमराजेंचा गंभीर आरोप

admin by admin
November 18, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
तुळजापूर नगरपरिषद: पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला केराची टोपली! महंतांना डावलून ड्रग्ज आरोपीला उमेदवारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर –  तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात मोठा अंतर्गत कलह आणि बंडखोरीची ठिणगी पडली आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी या पदासाठी गिरीगोसावी महंत इच्छागिरी गुरुमहादेवगिरी महाराज यांचे नाव सुचवले होते. मात्र, स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्षश्रेष्ठींच्या या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवत, ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आणि आपला ‘लाडका’ कार्यकर्ता पिटू उर्फ विनोद गंगणे यास उमेदवारी बहाल केली आहे.

राणा पाटलांची नक्की ‘मजबुरी’ काय?

आमदार राणा पाटील यांनी महंतांसारख्या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला डावलून, नुकताच जेलमधून जामिनावर सुटलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पसंती दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विनोद गंगणे हा ड्रग्ज प्रकरणात महिनाभर जेलमध्ये होता आणि सध्या जामिनावर आहे. असे असतानाही, “राणा पाटलांची नक्की काय मजबुरी आहे की त्यांना तुळजापुरात गंगणे शिवाय दुसरा उमेदवार दिसत नाही?” अशी कुजबुज आता केवळ तुळजापुरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरात सुरु झाली आहे. या निर्णयावर चौफेर टीकेची झोड उठली आहे.

ड्रग्जचा खरा सूत्रधार राणा पाटीलच: खा. ओमराजे निंबाळकर

या सर्व घडामोडींवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. निंबाळकर यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना म्हटले की, “तुळजापूरमधील ड्रग्ज रॅकेटचा खरा सूत्रधार हे आमदार राणा पाटीलच आहेत. त्यामुळेच अशा गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे.”

‘तुळजापूर ड्रग्जमुक्त आणि भयमुक्त करा’

तुळजापूर शहराला लागलेली ही कीड नष्ट करण्यासाठी नागरिकांनी आता पुढे येण्याची गरज असल्याचे ओमराजे यांनी म्हटले आहे. “तुळजापूर ड्रग्जमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठी अशा प्रवृत्तींना धडा शिकवा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा,” असे आवाहन खा. ओमराजे निंबाळकर यांनी जनतेला केले आहे.

गुन्हेगारांना अभय देण्याची परंपरा?

काही दिवसांपूर्वीच आमदार राणा पाटील यांनी याच ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपी असलेले दोन माजी नगराध्यक्ष, बापू कणे आणि संतोष परमेश्वर कदम, यांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता. आता थेट मुख्य आरोपीलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने, भाजपने गुन्हेगारांना पुनर्वसन करण्याचे धोरण स्वीकारले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

Previous Post

धाराशिवमध्ये राजकीय भूकंप? नगर परिषदेसाठी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येण्याच्या तयारीत!

Next Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक २०२५: अमित शिंदे यांचा उमेदवारी अर्ज ठरला वैध; कृष्णा मुंडे यांची हरकत फेटाळली

Next Post
धाराशिव नगर परिषद निवडणूक: भाजपचे उमेदवार अमित शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप

धाराशिव नगर परिषद निवडणूक २०२५: अमित शिंदे यांचा उमेदवारी अर्ज ठरला वैध; कृष्णा मुंडे यांची हरकत फेटाळली

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!