• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात बोगस गुंठेवारी प्रकरण: प्लॉटचे नियमितीकरण रद्द, मालकास नोटीस; चौकशीची मागणी

admin by admin
April 28, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
तुळजापुरात बोगस गुंठेवारी प्रकरण: प्लॉटचे नियमितीकरण रद्द, मालकास नोटीस; चौकशीची मागणी
0
SHARES
2.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – तुळजापूर शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे गुंठेवारी नियमित केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सर्वे नंबर २०७/२ मधील प्लॉट नंबर २८ ची गुंठेवारी बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने ती रद्द करण्यात आली असून, संबंधित प्लॉट मालक सुरज बंडू कानडे यांना नगरपालिकेने खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे.

ॲड. अश्विनकुमार अरुणराव घोरपडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती (अर्ज क्र. ७२३३). त्यांच्या पाठपुराव्यानंतर हे प्रकरण समोर आले. उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सदर प्लॉटची गुंठेवारीसाठी आवश्यक मोजणी झालेली नाही आणि त्यासाठी कोणताही अर्ज भूमी अभिलेख कार्यालयात प्राप्त झालेला नव्हता. नियम व अटींची पूर्तता होत नसल्याने भूमी अभिलेख कार्यालयाच्या संदर्भ क्र. ०१ अन्वये यापूर्वी केलेले नियमितीकरण रद्द करण्यात आले आहे.

आरोप आहे की, तत्कालीन मुख्याधिकारी लक्षमण कुंभार यांच्या कार्यकाळात, नगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी (विशेषतः नगररचना सहाय्यक श्रीमती मंगरूळे मॅडम यांच्यावर संशय व्यक्त होत आहे) अधिकाराचा दुरुपयोग करत बनावट कागदपत्रांच्या आधारे ही गुंठेवारी मंजूर केली. यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा झाला होता.

नूतन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत सुरज बंडू कानडे यांना नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत समाधानकारक खुलासा न आल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, ॲड. घोरपडे यांनी नगररचना सहाय्यक श्रीमती मंगरूळे यांच्या कार्यकाळात अशा प्रकारे आणखी किती बोगस गुंठेवारी प्रकरणे झाली आहेत, याची माहिती नगर परिषदेकडे मागितली आहे. तसेच, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणामुळे तुळजापूर नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Previous Post

तुळजापूरचे ‘ड्रग्ज’ पुराण: फरार आरोपी अटक न करण्याचे हे आहे कारण…

Next Post

परंड्याचं ‘एमडी’ पुराण ६.०: ब्रेझाचा ‘नंबर’ गेम आणि पोलिसांचा ‘सायलेंट’ मोड!

Next Post
परंड्याचं ‘एमडी’ पुराण ६.०: ब्रेझाचा ‘नंबर’ गेम आणि पोलिसांचा ‘सायलेंट’ मोड!

परंड्याचं 'एमडी' पुराण ६.०: ब्रेझाचा ‘नंबर’ गेम आणि पोलिसांचा ‘सायलेंट’ मोड!

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group