तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव उत्साहात पार पडला, भाविकांची मोठी गर्दी जमली, आणि पोलिसांचा बंदोबस्तही लावला गेला. भाविकांचं संरक्षण करण्यासाठी तब्बल दीड हजार पोलीस कर्मचारी हजर होते. देवीच्या चरणी नतमस्तक होण्यास आलेल्या भक्तांना सुरक्षेसाठी पोलिसांचा तंबू उभारला गेला होता, पण नेमका त्या तंबूतच एक वेगळा ‘अमंगल प्रसंग’ घडला.
तिन दिवसांपूर्वी, तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात एसपी साहेबांनी नेमलेली एक खास सुरक्षा टीम कार्यरत होती. मात्र, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महोदयांनी मंदिरात वेगळ्याच कर्तृत्वाचं प्रदर्शन करत, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला गैरवर्तनाचा धक्का दिला. कोल्हापूर परिक्षेत्रातून आलेल्या या महिला पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार ऐकताच, या कर्तुत्ववंत उपनिरीक्षक महोदयांचे चेहऱ्यावरचे वक्षस्थळावर ठेवलेले हात हवालदिल झाले.’डोके‘ गरगराला लागले. महोदयांचं म्हणणं इतकं निरागस की, त्यांचं स्पष्टीकरण येता आलं, “मी काहीच केलं नाही, फक्त माझ्या ‘किरणांचीच‘ उष्णता पोहोचली असावी!”
अखेर, मोठं प्रकरण होऊ नये म्हणून, खाकी वर्दीवर डाग लागू नये म्हणून, प्रकरणाला गुपचूप माफीनामा घेऊन मिटवलं गेलं. पण एक सवाल मात्र उरतोच – आई जगदंबेच्या दरबारात अशी किचकट ‘खाकी कथा’ होणे उचित आहे का? सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सगळं दृश्य कैद केलंय, पण देवीचा दरबार साक्ष देईल का?देवळातलं पावित्र्य जपायला असणारी खाकी वर्दी अशा प्रसंगांची निर्मिती करते, तेव्हा देवीचाही थोडा विचार करावा लागतो!





