धाराशिव : तुळजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या वीट्टभट्या सुरु असून त्याची तात्काळ चौकशी करुन कारवाई करावी , या व अन्य मागण्याकरीता धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धाराशिव – येडशी रस्त्यावर रास्ता रोको करणाऱ्या १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-गणेश प्रभाकर पाटील, बालाजी रामचंद्र जाधव, रा. तुळजापूर, गणी बाबुलाल मुलाणी रा तेरखेडा, निखील माणिक अमृतराव रा. धाराशिव, चंद्रकांत निवृत्ती गायकवाड, रा. नळदुर्ग, तानाजी गोपाळ जाधव, रा मंगरुळ, ता. कळंब, पंडीत आण्णाप्पा जळकोटे, रा केसरजवळगा ता. उमरगा, शिध्देश्वर अंबाजी गायकवाड रा. केसरजवळगा ता. उमरगा, मुकुंद दत्तु मरडे, रा किलज, श्रीकांत भिमा करंडे, रा. मुर्टा, सारिका चुंगे रा. मुर्टा, अनिता गणेश लष्करे, स्वाती वसंत जाधव, निर्मला नामदेव सुरवसे, सुवर्ण साधु कांबळे, कलावती सिध्देश्वर गायकवाड, दत्तात्रय नागनाथ कांबळे रा. काटी ईतर 10 ते 15 इसमांनी दि. 20.06.2024 रोजी 12.00 ते 13.00 वा.सु. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको केला होता.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये मनाई आदेश लागु असताना व लोकसेवकाने दिलेल्या सुचनांचे पालन न करता तुळजापूर तालुक्यातील प्रदुषण महामंडळ लातुर यांचा परवाना नसताना तसेच तहसिल कार्यालय तुळजापूर यांनी कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना दिला नसताना तुळजापूर तालुक्यातील वीट्टभट्या बेकायदेशीररित्या सुरु असुन त्यांचेवर तात्काळ चौकशी करुन कार्यवाही करावी या मागण्याकरीता बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर रास्ता रोको करुन वाहनास अडथळा आणुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्ञानेश्वर भगवान कागवे- नेमणुक पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.20.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-341, 188,283, 143, सह 135 मपोका अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.