• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरचे ‘फरार’ गायक आणि गोंधळलेले तामलवाडी पोलीस!

admin by admin
April 28, 2025
in गोफणगुंडा
Reading Time: 1 min read
तुळजापूरचे ‘फरार’ गायक आणि गोंधळलेले तामलवाडी पोलीस!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

अहो, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची काय गत सांगावी! एकूण ३६ जणांवर आरोप, जणू क्रिकेटची टीम तयार करायला निघाले होते की काय कोण जाणे! त्यातले १४ बहाद्दर तर लागले पोलिसांच्या हाती, आता ते तुरुंगात बसून ‘भजनी मंडळ’ सुरू करायचा विचार करत असतील. पण खरी मेख आहे उरलेल्या २२ जणांची! हे २२ लोक असे फरार झालेत की विचारू नका. १४ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला, व्हॅलेंटाईन डे ला पोलिसांनी यांना प्रेमाऐवजी कायद्याचा अर्थ समजावला. मग काय, दोन महिन्यात पोलिसांनी १० हजार पानांचं जंगी आरोपपत्र पण दाखल केलं, वाचता वाचता डोळ्यांवर पट्टी यावी!

पण गंमत पुढेच आहे. मागचा दीड महिना उलटून गेला, पण त्या २२ फरार आरोपींपैकी एकालाही पकडण्यात तामलवाडी पोलिसांना यश आलेलं नाही. गावात चर्चा सुरू झाली, “अहो, हे पोलीस करतायत तरी काय? चहा पितात की झोपा काढतात?” पोलीस एकदम ‘थंड’! जणू काही त्यांना या २२ जणांची काळजीच नाही.

इकडे जनता हैराण, तिकडे तामलवाडी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर ठाकूर डोक्याला हात लावून बसलेले. त्यांच्यासमोर नुकतंच आलेलं ४४ पानांचं नवीन पुरवणी आरोपपत्र पडलेलं होतं. ते १० हजार पानांचं जुनं आरोपपत्र तर कपाटात मानाने ठेवलं होतं.

“साहेब,” हवालदार काळे दबक्या आवाजात म्हणाला, “ते २२ जण सापडत का नाहीत हो? काही सुगावा?”

इन्स्पेक्टर ठाकूरने एक थंड उसासा टाकला. “अरे काळे, सुगावा काय विचारतोस? ते २२ च्या २२ जण रोज संध्याकाळी तुळजाभवानी मंदिराच्या पायथ्याशी सापडतात की!”

काळे चक्रावला. “काय सांगता साहेब? मग पकडत का नाही आपण त्यांना?”

“अरे वेड्या,” ठाकूर म्हणाले, “ते तिथे काय करतात माहित्येय? त्यांनी ‘नवजीवन संगीत भजन मंडळ’ सुरू केलंय! आणि काय योगायोग बघ, बरोबर २२ सदस्य आहेत त्यांच्या मंडळात. आणि भजनं काय गातात म्हणतोस! असा काही दैवी सूर लावलाय त्यांनी की पब्लिक तुफान गर्दी करतंय. काल तर आपल्या साहेबांच्या बायकोने पण त्यांच्या भजनाचं कौतुक केलं.”

“पण साहेब, ते ड्रग्ज प्रकरणातले आरोपी आहेत!” काळे कळकळीने म्हणाला.

“तेच तर! आता सांग, ऐन भजनाच्या कार्यक्रमात, जिथे शेकडो लोकं टाळ्या वाजवत आहेत, तिथे जाऊन आपण त्यांना ड्रग्ज केसमध्ये अटक केली तर काय होईल? लोक आपल्यालाच चोप देतील! आणि त्यांचं भजन ऐकून एवढं पुण्य मिळतंय असं लोक म्हणतायत. त्यांना अटक केली तर लोकांच्या भावना दुखावतील!” ठाकूर वैतागून म्हणाले.

“आणि ते नवीन ४४ पानांचं आरोपपत्र?” काळेने विचारलं.

ठाकूर हसले. “त्यात काय असणार? त्यांच्या सगळ्यात लोकप्रिय भजनाचे शब्द आहेत… आणि खाली टीप लिहिली आहे – ‘सदर व्यक्ती भजन गायनात अत्यंत निपुण असून, त्यांच्या अटकेमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील तपास चालू आहे!'”

आता बोला! पोलीस थंड का आहेत हे कळलं का? ते तपास करत नाहीत असं नाही, पण आरोपींनी असा काही ‘सुरांचा’ मार्ग निवडलाय की पोलिसांना कायद्याच्या तालावर नाचणं कठीण झालंय! जनता भजन ऐकून खूश, पोलीस आरोपींना समोर बघून हतबल, आणि ते २२ ‘फरार’ गायक मात्र रोज ‘कान्हा रे…’ म्हणत पोलिसांना चकवा देत आहेत! आता पोलीस पुढच्या आरोपपत्रात त्यांच्या भजनाच्या सीडीचा पुरावा म्हणून समावेश करतात की काय, देव जाणे!

(वरील कथा सत्य घटनेवर काल्पनिक आहे)

Previous Post

वैद्यनाथ बँक गैरव्यवहार प्रकरण: पोलिसांचा ‘क’ समरी अहवाल फेटाळला, परळी न्यायालयाचा पुढील तपासाचा आदेश

Next Post

धाराशिवमध्ये जुन्या भांडणातून तिघांना मारहाण; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिवमध्ये जुन्या भांडणातून तिघांना मारहाण; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026

Recent Posts

  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!