धाराशिव : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधानसभेत Point of procedure मांडत गृह विभागावर जोरदार हल्ला चढवला.
विधीमंडळात प्रश्न येण्यापूर्वीच उत्तर लीक
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आमदार कैलास पाटील यांनी विधीमंडळात लक्षवेधी मांडली होती. या प्रश्नाचे उत्तर विधीमंडळात दिले जाणे अपेक्षित होते. मात्र, पोलीस महासंचालकांनी धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडून माहिती मागवल्यानंतर, त्या माहितीचे उत्तर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे एक खासगी स्वीय सहाय्यक यांनी तुळजापूरच्या पत्रकार ग्रुपवर पोस्ट केले.
आमदार कैलास पाटील यांची आक्रमक भूमिका
उत्तर लीक झाल्याने आमदार कैलास पाटील संतापले असून, त्यांनी विधानसभेत गृह विभागावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, ड्रग्ज पेडलरला कोण वाचवत आहे? कुणाचा आशीर्वाद आहे?
सरकारची भूमिका संशयास्पद
आमदार पाटील यांनी सरकारवर आरोप करत विचारले की, ड्रग्ज पेडलरला वाचवण्यासाठी कोण जबाबदार आहे? तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रकरणी सरकारची प्रतिक्रिया अपेक्षित
या घडामोडीनंतर सरकारची भूमिका काय असणार आणि गृह विभाग यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून स्थानिक राजकीय वातावरण तापले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
Video