तुळजापूरमध्ये एमडी ड्रग्ज रॅकेटचा गुंता अधिकाधिक उलगडत चालला आहे. तामलवाडी पोलिसांनी काल सयाजी चव्हाण, सुमित शिंदे आणि ऋषिकेश गाडे या तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एकूण आरोपींची संख्या १५ वर, अजून चौकशी सुरू!
या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.पैकी सहाजण फरार आहेत.
- दोन आरोपी – स्वराज्य उर्फ पिनू तेलंग ( तुळजापूर ) आणि वैभव गोळे ( मुंबई ) अजूनही फरार आहेत.
- चार आरोपींची नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली आहेत.
- अजून काही नवीन आरोपी समोर येण्याची शक्यता आहे.
अटक आरोपींची यादी:
1️⃣ संगीता गोळे (मुंबई)
2️⃣ अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे (तुळजापूर)
3️⃣ युवराज देविदास दळवी (तुळजापूर)
4️⃣ संदीप संजय राठोड (नळदुर्ग)
5️⃣ संतोष खोत (मुंबई)
6️⃣ विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे (सराटी, भाजप पदाधिकारी)
7️⃣सयाजी चव्हाण (तुळजापूर)
8️⃣ सुमित शिंदे (तुळजापूर)
9️⃣ ऋषिकेश गाडे (तुळजापूर)
१४ फेब्रुवारीला उघडकीस आलेलं ड्रग्ज रॅकेट
तुळजापूरमध्ये १४ फेब्रुवारीला विक्रीसाठी येणाऱ्या एमडी ड्रग्जचा साठा पोलिसांनी पकडला होता.
- त्या वेळीच या कार्टेलमध्ये मोठी नावे असण्याचा संशय व्यक्त केला जात होता.
- तपास सुरू झाल्यानंतर तुम्ही राजकीय वरदहस्त असलेल्या आरोपींची नावं समोर येऊ लागली.
- विशेषतः विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याची अटक मोठी चर्चा झाली होती.
तपासाची गती वाढली, आणखी मोठी नावे येणार?
या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक संजय जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांची टीम करत आहे.
- पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला असून आणखी काही बड्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
- फरार आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
- या ड्रग्ज नेटवर्कला पाठीशी घालणाऱ्या ‘बड्या मास्यां’वर कारवाई होणार का?
तुळजापूर शहर आणि संपूर्ण राज्याचे लक्ष आता या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आहे!