तुळजापूर: तुळजापूरमध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्थानिक भाजप आमदारांच्या कार्यकर्त्यांनीच तुळजापूर शहराला बदनाम केल्याचा आरोप केला.
धीरज पाटील यांनी स्पष्ट केले की, तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात माजी नगराध्यक्ष यांचे पती विनोद उर्फ पिटू गंगणे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे माजी सभापती शरद रामकृष्ण जमदाडे , विश्वनाथ तर्फ पिंटू आप्पाराव मुळे यांच्यासह इतर भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे सर्वजण भाजपशी संबंधित असून त्यांच्या कृत्यांमुळे तुळजापूर शहराला नाहक बदनामी सहन करावी लागत आहे.
पाटील यांनी सांगितले की, तुळजापूर हे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे ठिकाण असून येथे अशा प्रकारच्या घटनेमुळे स्थानिकांचे प्रतिष्ठान धोक्यात आले आहे. सर्व प्रमुख आरोपीना मकोका लावावा, अशी मागणीही ऍड. धीरज पाटील यांनी केली आहे.
या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राणा जगजितसिंह पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ऍड, धीरज पाटील यांनी केली आहे.