• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 26, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ऑनलाइन गेमिंगचे अमिष महागात, तुळजापूरच्या पिता-पुत्राला १७ लाखांचा गंडा!

admin by admin
August 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शासनाने बंदी घातलेल्या ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून जास्त पैसे कमावण्याचे अमिष दाखवून तुळजापूर येथील एका पिता-पुत्राची तब्बल १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ येथील रहिवासी असलेले कालिदास लिंबाजी गवळी (वय ५४) यांचा मुलगा कृष्णा याला अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. जास्त पैसे कमावण्याचे अमिष दाखवत, आरोपींनी शासनाची बंदी असलेल्या ऑनलाइन गेमसाठी ‘exchange.com’ नावाची एक लिंक तयार केली. ही लिंक विविध व्हॉट्सॲप क्रमांकांवरून कृष्णा याला पाठवण्यात आली.

या बनावट गेमच्या जाळ्यात अडकून कालिदास गवळी आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांनी वेळोवेळी मोठी रक्कम गुंतवली. आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून संपर्क साधून त्यांच्याकडून एकूण १६,८५,४९८ रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कालिदास गवळी यांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५६ (२) आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाइन गेमिंग आणि झटपट पैसे कमावण्याच्या अमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

कात्री येथे जुगार अड्ड्यावर धाड, सहा जणांना अटक; १.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

धान्याचे गोडाऊन फोडून हरभरा चोरी, स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा; ६.२९ लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

धान्याचे गोडाऊन फोडून हरभरा चोरी, स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा; ६.२९ लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक

ताज्या बातम्या

 लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात? गुंडाच्या तक्रारीवरून पत्रकारालाच आरोपी करण्याची तयारी!

चौथ्या स्तंभाचा कणा, मोडाल कसा?

August 26, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

वृक्षारोपणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याचा राग; दिव्यांग व्यक्तीला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

August 25, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

प्रेमविवाहाचा राग: तरुणाला कोयता-कुऱ्हाडीने मारहाण, एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल

August 25, 2025
‘धाराशिव लाइव्ह’च्या संपादकाला धमकी; आनंद कंदलेवर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकार एकवटले

लेखणी थांबेल या भ्रमात राहू नका; ही झुंडशाही ठेचून काढल्याशिवाय पत्रकारिता शांत बसणार नाही!

August 25, 2025
‘धाराशिव लाइव्ह’च्या संपादकाला धमकी; आनंद कंदलेवर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकार एकवटले

‘धाराशिव लाइव्ह’च्या संपादकाला धमकी; आनंद कंदलेवर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकार एकवटले

August 25, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group