तुळजापूरमधील धमकी प्रकरणावर निवेदन द्यायला पत्रकारांनी एकत्र यावं, हा उद्देश चांगलाच होता… पण या “एकत्र येण्याच्या” कार्यक्रमात कौन था मौजूद? हा प्रश्न विचारल्यावर उत्तरात मुख्यतः “कंटेंट क्रिएटर्स” मिळाले!
“मुख्य पत्रकार” म्हणजे काय?
लोकमत, दिव्य मराठी, सकाळ हे मेंनस्टीमचे हायप्रोफाईल बॅचेस –
- चेतन धनुरे, बाबुराव चव्हाण, बाळासाहेब माने ( लोकमत )
- विठ्ठल सुतार, उपेंद्र कटके, संतोष जाधवर , सूरज पाचपिंडे ( दिव्य मराठी)
- राजेंद्र जाधव, अविनाश पोपळे ( सकाळ )
या यादीतील एकाही पत्रकाराचं दर्शन झालं नाही!
उपस्थित कोण?
उपस्थित पत्रकारांतून बहुतेकांनी पत्रकारितेला ‘रेटायरमेंट पूर्व अवकाळी विश्रांती’ घेतलेली होती.
काहींच्या गळ्यात माईक होता… पण स्क्रिप्टमध्ये आत्मा नव्हता.
युट्युब चॅनल्स, माईकवर स्टिकर लावून आलेले ब्रँडलेस प्रतिनिधी, आणि काहींना तर “गर्दी फुलवण्यासाठी” डोके म्हणून हजर केलं गेलं.लोक म्हणाले – “हे काय? मोबाईल चॅनल असोसिएशन आहे का?”
“कुणी बोलावलं?”
ज्यांच्यावर विजय गंगणे आणि इंद्रजीत साळुंके यांनी आरोप केले, त्याच पत्रकारांनीच ह्या गर्दीचे “इव्हेंट मॅनेजमेंट” केलं!
जणू काही, “पत्रकार समर्थन सभा – स्वतःचं केस मिटवण्यासाठी लोक जमवा” योजना सुरु झाली होती.
कडवट वास्तव :
यापूर्वीही आज हजर असलेले काही पत्रकार अन्यायग्रस्त होते –
त्यावेळी ही गर्दी कुठे होती?
की त्यावेळी चहा नव्हता म्हणून कोणी आलं नाही?
तोंड पाहून पत्रकार?
संपूर्ण प्रकरणाकडे पाहून सोशल मीडियावर एकच वाक्य फिरत आहे –
“पत्रकार एकत्र येतात… पण तोंड ओळखून!”
🎤 Moral of the Story:
पत्रकारितेत डोके हजर असणं महत्त्वाचं असतं, पण ते डोके विचार करणारं हवं!
- बोरूबहाद्दर