• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूर ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित

तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

admin by admin
April 16, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
अणदूर ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित
0
SHARES
943
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर:  तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींच्या आगामी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण आज येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्पोर्ट हॉलमध्ये जाहीर करण्यात आले. उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला.

या आरक्षणानुसार, तालुक्यातील सर्वाधिक ६० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पद सर्वसाधारण (खुले) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. २९ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), १८ ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि एका ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमाती (ST) साठी सरपंच पद राखीव ठेवण्यात आले आहे. नियमानुसार, एकूण सरपंच पदांपैकी ५० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत, जी संबंधित प्रवर्गांमध्ये विभागली गेली आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी १९९५ पासून लागू असलेल्या आरक्षण पद्धतीची माहिती दिली आणि त्या प्रक्रियेनुसार आरक्षण जाहीर केले. काही अनिर्णित ठिकाणी चिठ्ठ्या टाकून आरक्षण निश्चित करण्यात आले.

तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सिंदफळ, मसला, काटगाव, जळकोट, इटकळ, अणदूर या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पद ‘सर्वसाधारण स्त्री’साठी आरक्षित झाले आहे.

या आरक्षण सोडतीसाठी ग्रामीण भागातून नागरिक, कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मनाप्रमाणे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काहींनी जल्लोष केला, तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती.

यावेळी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांव्यतिरिक्त मंगेश वाघोलीकर, प्रशांत मलगे, दत्ता नन्नवरे, सुनील हत्तीकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

घाटंग्री आश्रमशाळा अधीक्षिकेचा मानसिक छळ, नियमबाह्य निलंबनाचा आरोप

Next Post

डोक्यांची गर्दी, पत्रकारितेचा गोंधळ!

Next Post
डोक्यांची गर्दी, पत्रकारितेचा गोंधळ!

डोक्यांची गर्दी, पत्रकारितेचा गोंधळ!

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

पीक विम्याचा ‘कागदी’ खेळ: धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या विमा कंपन्या आणि व्यवस्थेचा बळी!

July 25, 2026
धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

July 25, 2026
भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांवर सतीश वैद्य यांचा निशाणा

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांवर सतीश वैद्य यांचा निशाणा

July 25, 2026
२० वर्षांच्या निस्सीम भक्तीला साद: धाराशिवच्या माने दांपत्याला मिळाला विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान

आषाढी एकादशी : गौरगावच्या वारकरी दांपत्याचा शासकीय महापूजेत गौरव

July 25, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

लोहारा तालुक्यात विनापरवाना तलवार बाळगणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात!

July 25, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!