• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात कौटुंबिक वादातून थरार; ‘माझ्या पत्नीला परत का आणले नाही?’ विचारत तरुणावर चाकू हल्ला

admin by admin
June 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर –  ‘माझ्या पत्नीला तू घेऊन गेला होतास, तिला परत आणून का सोडले नाही?’ या कारणावरून एका तरुणावर लोखंडी चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तुळजापुरात घडली आहे. पीडित तरुणाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

ही घटना सोमवारी, २ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर घाटाखालील पुलाजवळ घडली. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बालाजी सुभाष शिंदे (रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नाना उत्तम कोकडे (रा. घाटशिळ रोड, बीडकर तलाव, तुळजापूर) याने त्यांना घाटाखालील पुलाजवळ अडवले.

‘तू माझ्या बायकोला नेले होतेस आणि परत आणून का सोडले नाही,’ असे म्हणत आरोपी कोकडेने फिर्यादी शिंदे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाद वाढला असता आरोपीने लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि जवळ असलेल्या लोखंडी चाकूने हल्ला करून शिंदे यांना गंभीर जखमी केले. तसेच, ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर बालाजी शिंदे यांनी त्याच दिवशी तामलवाडी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी नाना कोकडे विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२) (गंभीर दुखापत करणे), ३५२ (मारहाण), आणि ३५१(३) (जीवे मारण्याची धमकी) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

तुळजापूर तालुक्यातील नांदुरीत शेतरस्त्याचा वाद विकोपाला, लोखंडी पाईप व काठीने मारहाण

Next Post

धाराशिवमध्ये अवैध कत्तलखान्यांवर प्रशासनाचा बडगा; चार कत्तलखाने जमीनदोस्त

Next Post
धाराशिवमध्ये अवैध कत्तलखान्यांवर प्रशासनाचा बडगा; चार कत्तलखाने जमीनदोस्त

धाराशिवमध्ये अवैध कत्तलखान्यांवर प्रशासनाचा बडगा; चार कत्तलखाने जमीनदोस्त

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
  • उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली
  • धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
  • आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!