तुळजापूर : मयत नामे-1) रामचंद्र बलभिम भरगंडे, वय 32 वर्षे, 2) आप्पा जाधव दोघे रा. येवती ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.06.02.2024 रोजी 19.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 13 बी.यु. 9014 वरुन तुळजापूर येथुन येवती येथे तुळजापूर ते ईटकळ रोडने जात होते.
दरम्यान कसई शिवारातील रुपा पेट्रोलपंप जवळ ता. तुळजापूर येथे मोटरसायकल क्र एमएच 14 एच 1481 चा चालक आरोपी नामे- शिवराम सुभाष मारकड रा. यमगरवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चुकीच्या दिशने चालवून रामचंद्र भरगंडे यांचे मोटरसायकलला धडक दिली.
या अपघातात रामचंद्र भरगंडे व आरोपी नामे शिवराम मारकड हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर आप्पा जाधव हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोपीनाथ बलभिम भरगंडे, वय 34 वर्षे, रा. येवती ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.28.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 119, 184, 134 (अ) (ब), मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
भूम :आरोपी नामे-1) प्रकाश गोपाळ यादव, 2) निलेश प्रकाश यादव, 3) योगेश प्रकाश यादव, तिघे रा. वालवड ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 27.02.2024 रोजी 07.00 वा. सु. वालवड ता. भुम येथे फिर्यादी नामे- सुनिल किसन यादव, वय 53 वर्षे,रा. वालवंड ता. भुम जि. धाराशिव यांना आमच्या कुत्र्याला का मारले असे विचारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन दगड, लोखंडी रॉडने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा पुतण्या संदीपान यादव हा भांडण सोडवण्यास आला असता नमुद आरोपींनी त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुनिल यादव यांनी दि.28.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 326, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.