• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर-नळदुर्ग मतदार यादीत मोठा घोळ; मृतांची नावे कायम, जिवंत मतदार गायब!

शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट ) जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमराजे कदम यांचा भाजपचे नाव न घेता घरचा आहेर

admin by admin
October 17, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
तुळजापूर-नळदुर्ग मतदार यादीत मोठा घोळ; मृतांची नावे कायम, जिवंत मतदार गायब!
0
SHARES
201
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असून, एका सत्ताधारी पक्षाने प्रशासनाला हाताशी धरून केलेला राजकीय डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट ) जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमराजे कदम यांनी केला आहे.याद्यांमध्ये हजारो मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकण्यात आली असून, अनेक मयत व्यक्तींची नावे यादीत कायम आहेत, तर जिवंत मतदार गायब झाले आहेत. याविरोधात कदम यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी (दि. १७ ऑक्टोबर २०२५) लेखी तक्रार दाखल केली असून, मतदार याद्या तात्काळ दुरुस्त न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अमराजे कदम यांनी म्हटले आहे की, तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपालिकेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत गंभीर त्रुटी आहेत. अंदाजे २५०० ते ३००० मतदारांची नावे त्यांच्या रहिवासी प्रभागाऐवजी दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. इतकेच नाही, तर तुळजापूर शहरातील काही मतदारांची नावे नळदुर्ग नगर परिषदेच्या यादीत घुसडण्यात आली आहेत.

निवेदनात नमूद केलेल्या प्रमुख त्रुटी:

  • एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे दोन-तीन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागली गेली आहेत.
  • सुमारे १० ते १५ वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळलेली नाहीत.
  • नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या यादीतील अनेक पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
  • प्रभाग क्र. ७ मधील एका मतदाराचे नाव एका प्रभागात, तर त्यांच्या पत्नी आणि मुलीची नावे प्रभाग क्र. १० आणि ११ मध्ये टाकण्यात आली आहेत.
  • अनेक प्रभागांतील मतदारांना दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करून गोंधळ निर्माण केला आहे.

हा सर्व प्रकार सत्ताधारी राजकीय पक्षाने प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून हेतुपुरस्सर केल्याचा संशय शिवसेनेने व्यक्त केला आहे. चुकीच्या पद्धतीने तयार झालेल्या या सदोष मतदार याद्यांमुळे निवडणुकीत गोंधळ निर्माण होऊन नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर गदा येऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून मतदार यादीतील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, चुकीची नावे वगळून पात्र मतदारांचा समावेश करावा आणि अचूक मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा, या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही अमराजे कदम यांनी दिला आहे.

कदम यांनी भाजपचे नाव न घेता घरचा आहेर दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.

Previous Post

राष्ट्रवादीची ‘काळी दिवाळी’; तोकड्या मदतीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे फुगे फोडले

Next Post

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

March 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

March 1, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

March 1, 2026
‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

February 28, 2026
धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

February 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group