• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 14, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजाभवानीच्या दारात ‘पिचकारी’; सीसीटीव्हीने उघडले आठ पुजाऱ्यांचे बिंग!

श्रद्धेच्या आवारात व्यसनाचा मळवट, मंदिर प्रशासनाचा कारवाईचा बडगा!

admin by admin
June 12, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर
0
SHARES
677
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: जिथे लाखो भाविक श्रद्धेने नतमस्तक होतात, त्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी हा संतापजनक प्रकार कैद केला असून, मंदिर संस्थानने या आठही जणांना थेट नोटीस बजावत कारवाईचा बडगा उगारला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुजारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात, विशेषतः दर्शन मंडप, अभिषेक हॉल आणि पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी काही पुजारी तंबाखू, गुटखा यांसारखे पदार्थ खाऊन थुंकत असल्याच्या तक्रारी भाविकांकडून वाढल्या होत्या. पावित्र्य भंग करणाऱ्या या प्रकारांमुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी होती. या तक्रारींची दखल घेत मंदिर संस्थानने ७ जून रोजी एक जाहीर प्रगटन काढून मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर थेट मंदिर बंदीची कारवाई करण्याचा सज्जड इशारा दिला होता.

केवळ इशाऱ्यावर न थांबता, मंदिर प्रशासनाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या तपासणीत तब्बल आठ पुजारी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकताना रंगेहाथ पकडले गेले.

‘देऊळ कवायत’नुसार कारवाई

सीसीटीव्ही फुटेजचा भक्कम पुरावा हाती लागताच, मंदिर संस्थानने ‘देऊळ कवायत’ (मंदिर नियमावली) कलम २४ व २५ नुसार या आठही पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कारवाईच्या कचाट्यात सापडलेले पुजारी:

  1. वैभव विशाल भोसले
  2. विशाल दादासाहेब मगर
  3. लखन रोहिदास भोसले
  4. विशाल हन‍मंत चव्हाण
  5. विशाल बाळासाहेब गंगणे
  6. अक्षय किशोर कदम-भैरवदे
  7. राहुल हनुमंत पवार
  8. धीरज राजू चोपदार

तीन दिवसांची मुदत, अन्यथा तीन महिने बंदी!

नोटीस मिळालेल्या या पुजाऱ्यांना तीन दिवसांच्या आत आपला लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी दिलेला खुलासा समाधानकारक न वाटल्यास किंवा खुलासा न दिल्यास, या सर्वांवर तीन महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदीची कठोर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.

तपासणी अचानक थांबली, कारण गुलदस्त्यात!

एकीकडे आठ जणांवर कारवाई करून मंदिर प्रशासनाने शिस्तीचा संदेश दिला असला, तरी दुसरीकडे मंदिरात सुरू असलेली तपासणीची प्रक्रिया अचानक थांबवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही तपासणी का आणि कोणाच्या दबावामुळे थांबली, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या कारवाईत आणखी काही ‘मोठे मासे’ वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, अशी चर्चा आता मंदिर परिसरात सुरू झाली आहे.

Previous Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: प्रा. आलोक शिंदे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Next Post

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा, राज्य सरकारकडून प्रभाग रचनेचे आदेश जारी

Next Post
नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा, राज्य सरकारकडून प्रभाग रचनेचे आदेश जारी

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा, राज्य सरकारकडून प्रभाग रचनेचे आदेश जारी

ताज्या बातम्या

भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंड्यात पोलिसांची मोठी कारवाई, कत्तलीसाठी जाणारी २६ वासरे वाचवली; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 14, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नळदुर्ग पोलिसांची पान टपरीवर धाड, ९ हजारांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त

June 14, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडीत ६७ हजारांचा ऐवज, तर दोन मोटारसायकली लंपास

June 14, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

परंडा : ५५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, जातीवाचक शिवीगाळ करत तोंडावर थुंकले; चौघांवर गुन्हा दाखल

June 14, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये स्कुटीच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल

June 14, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group