तुळजापूर : मयत नामे- सागर विलास इंगळे, वय 35 वर्षे, रा.तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.10.10.2023 रोजी 21.00 वा. सु. हॉटेल सन ऑफ सन जवळील घाटातील एस आकाराचे वळणावर तुळजापूर सोलापूर रोडवर मोटर सायकल वरुन जात होते. दरम्यान ट्रक क्र जी.जे. 03 बी. वाय. 7585 चा चालकाने त्यांचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून पलटी करुन स्वता व किन्नर यांना जखमी केले. तसेच मयत सागर इंगळे हे ट्रक खाली आडकुण गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी विनायक बाबुराव गुंड, वय 53 वर्षे, रा. जिजामाता नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.11.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337,304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-येमन शिवलिंग कटके, वय 64 वर्षे, रा. आरळी खु ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे दि. 10.10.2023 रोजी 20.00 वा. सु. ते दि. 11.10.2023 रोजी 00.23 वा. सु. आरळी खु, ता. तुळजापूर, येथील शेत गट नं 180/01 आठ एक्कर मधील सोयाबिन पिकाच्या ढिगाऱ्यास अज्ञात व्यक्तीने आग लावून नुकसान केले. अशा मजकुराच्या येमन कटके यांनी दि.11.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 435, 427 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.