तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या नावे मंदिर समितीशी साधर्म्य असलेले मोबाईल ऍप काढून भाविकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री तुळजाभवानी देवीच्या नावे मंदिर समितीशी साधर्म्य असलेली वेबसाईट आणि ऍप काढून भाविकांकडून देणग्या घेण्याचे प्रकार कोरोना काळात उघडकीस आला होता. हा प्रकार धाराशिव लाइव्हने उघडकीस आणल्यानंतर चार वेबसाइटवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीही हा प्रकार सुरूच असून, त्याला कुणाचा आशीर्वाद आहे ? असा प्रश्न विचारला जात आहे.
आरोपी नामे- 1) विजय सुनिल बोदले, रा. शुक्रवार पेठ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.15.07.2023 रोजी 20.40 वा. सु. शुक्रवार पेठ तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मंदीर प्रशानाची कसलीही परवानी न घेता श्री. तुळजाभवानी देवीजीचे नावाशी साधर्म्य असणारे एचटीटीपी:// उत्सव ॲपडाटइन/क्रिया/मा-तुलजा-भवानी-टेम्पल ऑनलाईन- पुजा या नावाचे संगणकीय सांधनांचा वापर करुन वेबबेस्ड व मोबाईल बेस्ड ॲप्लीकेशन तयार करुन श्री. तुळजाभवानी देवीजींचा फोटो व लोगो वापरुन ते श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानाचे अधिकृत ॲप असल्याचे भासवून त्यावरती भाविंकामार्फत वेगवेगळ्या पुजा करण्यासाठी भाविकांकडून पैसे घेवून भाविकांची व मंदीर संस्थानाची फसवणुक केली.अशा मजकुराच्या फिर्यादी- अनिल बापुराव चव्हाण, वय 57 वर्षे, व्यवस्थापक विद्युत श्री. तुळजाभवानी रा. श्री तुळजाभवानी मंदीर कॉर्टर तुळजापुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 417, 419, 420, भा.दं.वि.सं. सह कलम 66(सी), 66(डी) आय. टी. ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आणखी एक फसवणूक
धाराशिव :आरोपी नामे- 1)संभाजी खंडु मगर, वय 49 वर्षे, रा. सांगवी काटी ता. तुळजापूर, जि. धाराशिव ह.तु. प्लॉट नं 70 राव कॉलनी प्रतिष्ठा अपार्टमेंट तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे, 2) गोवर्धन जनार्धन मगर, वय 57 वर्षे, रा. सांगवी काटी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 04.02.2020 ते दि.08.12.2020 पावेतो बार्शी येथील तुळजाभवानी इंन्टरप्रायजेस कंपनीचे टेलीफोन केबलच्या कामाची ऑर्डर दिली परंतु काम कोठे करायचे व कसे करायचे याबाबत काही न सांगता फिर्यादीस कामाच आमीष दाखवून खोटी बनावट वर्क ऑर्डर तयार करुन फिर्यादी व साक्षीदार यांचे कडून 7,50,000₹ खात्यावर वर्ग करुन घेवून काम न देता फसवणुक केली. वरुन मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय कोर्ट क्र 4 धाराशिव यांचे आदेश जा क्र फौजदारी /4503 दि. 11.12.2023 अन्वये सी आर पी सी 156 (3) अन्वये फिर्यादी- निळकंठ शंकरराव रणदिवे, वय 49 रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव ह.मु. महसुल कॉलनी, राजी गांधीनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 420, 406, 471, 467, 468 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.