तुळजापूर – शहरातील जुने बसस्थानक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभ्या केल्याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी दोन रिक्षा चालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
गुलचंद राम कदम (वय ५३, रा. हडको, तुळजापूर) आणि सतिश महादेव कांबळे (वय ४५, रा. ढेकरी, ता. तुळजापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, १० जुलै रोजी सायंकाळी पावणेसात ते सातच्या सुमारास जुने बसस्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी गुलचंद कदम यांनी त्यांची रिक्षा (क्र. एमएच १३ एएफ २८६२) आणि सतिश कांबळे यांनी त्यांची रिक्षा (क्र. एमएच २५ एके ०८४५) सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा रीतीने उभ्या केल्या होत्या.
गस्तीवर असलेल्या पोलिसांना हे आढळून आल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देत दोन्ही चालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. शहरातील वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपली वाहने योग्य ठिकाणी पार्क करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आष्टामोड येथे रस्त्यावर धोकादायकरित्या रिक्षा उभ्या करणे पडले महागात, दोघांवर गुन्हे दाखल
मुरुम – शहरातील आष्टामोड बसस्थानक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने ॲपे रिक्षा उभ्या केल्याप्रकरणी मुरुम पोलिसांनी दोन चालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. रात्री-अपरात्री रस्त्यावर वाहने धोकादायकरित्या उभी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
राजकुमार अशोक उपासे (वय ३६, रा. जेवळी द.) आणि भास्कर पंडीत साळुंके (वय ३२, रा. जेवळी उत्तर) अशी गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, १० जुलै रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आष्टामोड बसस्थानक येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना दोन ॲपे रिक्षा (क्र. एमएच २५ एम ०७२४ आणि क्र. एमएच २३ एक्स ३७५९) रस्त्यावर वाहतुकीस धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभ्या असलेल्या आढळून आल्या.
यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना अडथळा निर्माण होत होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही रिक्षा चालकांवर सरकारतर्फे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून राजकुमार उपासे आणि भास्कर साळुंके यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये मुरुम पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.