• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात जलसंधारण योजनांमध्ये कोट्यवधींचा गाळ – बोगस कामांचा भांडाफोड!

admin by admin
July 11, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये जलसंधारण योजनेत कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  – एकीकडे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट कायम असताना, दुसरीकडे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गाळ जनतेच्या पैशातूनच लाटला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा जलसंधारण कार्यालयातील प्रभारी अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी बोगस शेतकरी, शैक्षणिक संस्था यांच्या नावावर बनावट गाळ काढल्याची कामे दाखवून मोठ्या प्रमाणात निधी उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ही योजना सुरू झाली होती. तिचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व जलसाठा सुधारण्याचा होता. मात्र धाराशिवमध्ये या योजनेचे रूपांतर भ्रष्टाचाराच्या महासागरात झाले आहे. जिल्ह्यातील काही तलावांमध्ये गाळच नसताना तिथेही गाळ काढल्याचे दाखवले गेले आहे. इतकेच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगरच्या काही शैक्षणिक संस्थांनीही गाळ काढल्याच्या नावाखाली कोट्यवधींची बिले सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे भूम येथील ‘भाग्यलक्ष्मी सेवाभावी संस्था‘ या एका संस्थेवर तब्बल ६५ कामे एकाच वेळी देण्यात आली आहेत. प्रभाकर महामुनी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी टक्केवारीच्या बदल्यात ही कामे मंजूर करून घेतली आणि कोट्यवधी रुपयांचा निधी गाळातच घातला.

माहितीचा अधिकारही पायदळी!

निखिल गंभीरे या सुशिक्षित बेरोजगाराने माहितीच्या अधिकारात यासंबंधी मागणी केली होती. मात्र ४५ दिवस उलटूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. काही ठिकाणी गाळ काढल्याचे दाखवून शेतात गाळ न टाकता खोट्या घनमीटरवर आधारित बिले उचलल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

चौकशीची मागणी

या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, प्रभाकर महामुनी व त्यांच्या नातेवाईकांनी काय संपत्ती मिळवली, कोणते प्रतिनिधी त्यांच्या मागे आहेत, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

प्रश्न कायम – कोण आहे “बोलवता धनी?”

प्रभाकर महामुनी यांचा जिल्ह्यातील अचानक वाढलेला प्रभाव, अनेक संस्था चालकांची त्यांच्या कार्यालयाबाहेरची गर्दी, तसेच टक्केवारीवर काम वाटप, यामागे कोणता लोकप्रतिनिधी आहे, हेही जिल्ह्यातील जनतेला सतावतंय.


 

Previous Post

तुळजापूर: वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोन रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल

Next Post

आर्थिक व्यवहारातून किडनॅप आणि अमानुष मारहाण; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी फरार

Next Post
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

आर्थिक व्यवहारातून किडनॅप आणि अमानुष मारहाण; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी फरार

ताज्या बातम्या

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

July 28, 2026
विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

July 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; दुचाकी, सोलर केबल आणि बोअरवेलची वायर लंपास

July 28, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नळदुर्गात बँक अधिकाऱ्याच्या साहाय्याने मयत आई अन् आजारी वडिलांच्या बनावट सह्या करून कर्जाची उचल

July 28, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा तालुक्यातील औराद (गुं) येथे ७२ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण!

July 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!