तुळजापूर – विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असताना, तुळजापूर मतदारसंघातील बोळेगाव मतदान केंद्रावर एक गंभीर घटना समोर आली आहे. मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास सक्त मनाई असतानाही, राम हनुमंत सुतार यांनी मोबाईलचा वापर करत मतदानाचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ “तयारीला लागा, गुलाल आपलाच” या कॅप्शनसह त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हायरल करण्यात आला.
या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार, नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद आहे की, तुळजापूर मतदारसंघातील बोळेगाव मध्ये मतदान केंद्र क्रमांक ४१० , खोली क्रमांक १ येथे मतदारांनी आपले मतदान केले होते. त्याच दिवशी मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्याची माहिती मिळाली.
संबंधित व्हिडीओ राम हनुमंत सुतार यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आढळून आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २२३ नुसार नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण बातमी वाचा
तुळजापूर मतदारसंघ : तयारीला लागा, गुलाल आपलाच !