• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सोयाबीन खरेदीला गती, शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन कोटी जमा

उर्वरित शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करावी - आमदार राणाजगजितसिंह पाटील

admin by admin
November 22, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
सोयाबीनच्या खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा  होण्यास सुरुवात
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – बारदान्याचा तुटावड्या अभावी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. त्या अडचणी आता दूर केल्या आहेत. खरेदीलाही मोठी गती आली आहे. आजवर 12 हजार 758 क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. तर निकषात बसणाऱ्या 6 हजार 328 क्विंटल सोयाबीनचे रू.4892 या हमीभावाप्रमाणे तीन कोटी नऊ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसाच्या आत रक्कम जमा केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हमीभाव खरेदी केंद्राकडे नोंदणी केली नाही त्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना केले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील 17 हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. सुरूवातीच्या काळात बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब निर्माण झाला होता. फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया आपण तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला. त्यामुळे आता हमीभाव केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला मोठी गती आहे. परिणामी खुल्या बाजारातही सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत दिलेल्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा. ज्या शेतकर्‍यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील भूम, दस्तापूर, गुंजोटी, ईट, नळदुर्ग, कळंब, वाशी, उमरगा, धाराशिव, सोन्नेवाडी, चिखली, शिराढोण, टाकळी बें, तुळजापूर, कानेगाव, कनगरा, चोराखळी आदी 17 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. आतापर्यंत 12 हजार 758 क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. 6 हजार 328 क्विंटल सोयाबीनचे रू. तीन कोटी नऊ पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. यापूर्वी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी 15 नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यामुळे हमीभाव खरेदी केंद्राच्या प्रक्रियेला मुदत वाढ मिळावी अशी मागणी आपण केली होती. त्यानंतर त्यात वाढ करून आता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत त्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करण्याची घाई न करता लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.

चार दिवसात सोयाबीनचे पैसे खात्यात जमा

यापूर्वी सोयाबीन विक्रीचे पैसे मिळावे याकरिता चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता चार दिवसांच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होत आहेत. आजवर सोयाबीन विक्री केलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात रू. तीन कोटी नऊ जमा करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर 12 टक्के आर्द्रतेचा निकष आहे. वाहतूक खर्चाचे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापूर्वी आर्द्रतेची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

Previous Post

तुळजापूर ; मतदान केंद्रावर मोबाईल वापरून व्हिडीओ शूट

Next Post

धाराशिव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!