भूम – तालुक्यातील पिंपळगाव येथील सचिन उर्फ नितीन बिरबल शिंदे, हनुमंत शिवाजी शिंदे, बिरमल शिवाजी शिंदे, विठ्ठल शिवाजी शिंदे, रामदास विठ्ठल शिंदे या पाच जणांनी संगणकाच्या सहाय्याने बनावट कागदपत्रे तयार करून, त्यावर खोट्या सह्या करून, बेकायदेशीरपणे जमीन मोजणी करून बार्शीतील महादेव प्रल्हाद धस यांची फसवणूक केल्याप्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीत भुमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी एस एम खराडे यांचाही समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी 14 डिसेंबर 2022 ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मोजणीच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमीन मोजणी केली.
महादेव धस यांनी 4 सप्टेंबर 2024 रोजी याबाबत भुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 420, 406, 467, 468, 471, 120 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.