धाराशिव – विधानसभेच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने प्रत्येकी दोन जागा मिळवत कडवी लढत दिली. चार पैकी एका विद्यमान आमदाराला पराभवाचा सामना करावा लागला, तर दुसरा आमदार थोडक्यात विजय मिळवण्यात यशस्वी झाला.
विजयी उमेदवार – धाराशिव मतदारसंघातून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील, तुळजापूरमधून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि परंड्यातून शिवसेना शिंदे गटाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपली जागा कायम ठेवली.
ज्ञानराज चौगुले यांचा धक्कादायक पराभव – उमरगा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले, ज्यांनी सलग तीन निवडणुका जिंकत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली होती, यंदा मात्र पराभूत झाले. 2009 मध्ये लोकांनी स्वतःच्या पैशाने त्यांना निवडून दिले होते, परंतु त्यांनी तीन टर्म आमदारकीमध्ये भरपूर पैसा कमवला, तो लोकांना दिसत होता. त्यांचा माज, पैशाचा अपव्यय, आणि स्थानिक संपर्काचा अभाव यामुळे यावेळी मतदारांनी त्यांना नाकारले. विशेष म्हणजे, मतदारांनी त्यांच्या विरोधकासाठीही आर्थिक मदत करून त्यांचा पराभव घडवून आणला.
तानाजी सावंत यांचा थोडक्यात बचाव – परंडा मतदारसंघात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना केवळ 1,509 मतांनी विजय मिळाला. निवडणुकीच्या प्रत्येक फेरीत ते कधी आघाडीवर, तर कधी पिछाडीवर होते. वाचाळपणा, मतदारसंघातील दुर्लक्ष, नातेवाईकांवर अवलंबून राहणे, आणि स्थानिक जनतेशी संपर्काचा अभाव यामुळे त्यांचा पराभव अटळ वाटत होता. मात्र, “लाडक्या बहिणी” योजनेमुळे त्यांना थोडक्यात सुटका मिळाली.
निष्कर्ष धाराशिव जिल्ह्यातील निकाल महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अर्ध्या-अर्ध्या वाटणीवर स्थिरावला आहे. काही नेत्यांचा घमेंडखोरपणा आणि स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष हे या निवडणुकीतील निकालांचे मुख्य ठळक मुद्दे ठरले.
कोणत्या उमेदवाराला किती मते
उमरगा
उमरगा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना (शिंदे गटाचे) ज्ञानराज चौगुले – ९२ हजार २४१,(उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे) प्रवीण स्वामी -९६ हजार २०६,बहुजन समाज पार्टीच्या सुनंदा रसाळ -११७६,वंचित बहुजन आघाडीचे राम गायकवाड -४०८७ ,मराठवाडा मुक्ती मोर्चाचे शिवप्रसाद काजळे -२६५,प्रहार जनशक्ती पार्टीचे सातलिंग स्वामी -४०८, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( ए) चे संदीप कटबु -३६३,अजयकुमार देडे (अपक्ष) -५३९,उमाजी गायकवाड (अपक्ष) -३१३आणि श्रीरंग सरवदे (अपक्ष) – ८४५ मते मिळाली.तर नोटाला १३३० मते मिळाली.या मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) प्रवीण स्वामी विजयी झाले.
तुळजापूर
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कुलदीप धीरज कदम पाटील – ९४ हजार ९८४ ,भारतीय जनता पार्टीचे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील – १ लक्ष ३० हजार ८६३, प्रहार जनशक्ती पार्टीचे अण्णासाहेब दराडे -१४३८,ऑल इंडिया मजलिस -ए -इन्कलाब- ए- मिल्लतचे शब्बीर सल्लाउद्दीन तांबोळी – २४९,राष्ट्रीय समाज पक्षाचे धनंजय तर्कसे पाटील -२४१, आदर्श संग्राम पार्टीचे धीरज पाटील – १८७,आझाद समाज पार्टी (कांशी राम ) भैय्यासाहेब नागटिळे – ७९२,समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी – १६ हजार ३३५, संभाजी ब्रिगेड पार्टीचे शरद पवार – २३८, जनहित लोकशाही पार्टीचे सचिन शेंडगे – १७०,वंचित बहुजन आघाडीच्या डॉ.स्नेहा सोनकाटे – ७९०८,अमीर शेख (अपक्ष) – २५३,अमेर शेख (अपक्ष) – १६५,उज्वला गाटे (अपक्ष ) -३०७,काकासाहेब राठोड (अपक्ष)-४१८,योगेश केदार (अपक्ष) -५४९,तात्या रोडे (अपक्ष) – ६००, दत्तात्रय कदम (अपक्ष) – ७४४,धनाजी हुंबे (अपक्ष) -१५३,ऍड.पूजा देडे (अपक्ष) – ३७९,मन्सूर शेख (अपक्ष) -११४,गणेश रोचकरी (अपक्ष) – १५५,आणि सत्यवान सुरवसे (अपक्ष) -४६८ मते मिळाली. नोटाला ७६९ मते मिळाली.या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे राणाजगजितसिंह पाटील विजयी झाले.नोटाला ७६९ मते मिळाली.
धाराशिव
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) चे अजित पिंगळे यांना ९४ हजार ७,(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कैलास घाडगे पाटील – १ लाख ३० हजार ५७३,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवदत्त मोरे – २ हजार ४२, बहुजन समाज पार्टीचे लहू खुने – ५९५,वंचित बहुजन आघाडीचे प्रणित डिकले – १० हजार ११७, भारतीय जनविकास पार्टीचे डॉ.रमेश बनसोडे – २८३,राष्ट्रीय समाज पक्षाचे श्रीहरी माळी – १४४०, टिपू सुलतान पार्टीचे सिराज सय्यद – ५११,अशोक कसबे (अपक्ष) – ४२६,दत्ता तुपे (अपक्ष) – २४०, नितीन काळे (अपक्ष) – ६०३ आणि विक्रम काळे (अपक्ष) – ५७७ मते मिळाली.१५८१ मते नोटाला मिळाली.यामध्ये शिवसेना (उबाठा) कैलास पाटील घाडगे विजयी झाले.
परंडा
परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रा.डॉ.तानाजी सावंत – १ लक्ष ३ हजार ३५४ , बहुजन समाज पार्टीचे महादेव लोखंडे – ८५६, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे राजेंद्र गपाट – ८५३, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राहुल मोटे – १ लक्ष १ हजार ७४५, राष्ट्रीय समाज दल(आर) चे आर्यनराजे शिंदे – ६०२,वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल – १२ हजार ६९८,राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ.राहुल घुले – २१७० , समाजवादी पार्टीचे ॲड.रेवण भोसले -१६७, बहुजन महापार्टीचे शाहाजहान शेख – ११७ ,अरुण जाधवर (अपक्ष) -३५१,असिफ जमादार (अपक्ष) -३२३, गुरुदास कांबळे (अपक्ष) -४७२,जमिलखा पठाण (अपक्ष) -४४४६,दिनेश मांगले (अपक्ष) -२३६,विनयराज देशमुख (अपक्ष) -१३२,श्रीमती नुरजहा शेख (अपक्ष) -६९४, बंडू पोळ (अपक्ष) -७८७ ,राहुल मोटे (अपक्ष) – ७९०, लक्ष्मीकांत आटूळे (अपक्ष ) -१२५४, सोमनाथ कदम (अपक्ष) -८५८ व संभाजी शिंदे (अपक्ष,) यांना १३२ मते मिळाली. ६८८ मते नोटाला मिळाली.या मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे विजयी झाले.