उमरगा तालुक्यातील चिंचोली ज. गावाजवळ झालेल्या अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सुनिल शिवाप्पा तानवडे (रा. चिंचोली ज.) याने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाल्याचा आरोप आहे.
रज्जाक अत्तार (वय 25, रा. हत्तरगा, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) हे 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांच्या मोटरसायकलवरून भाजीपाला विकून चिंचोली ज. गावातून बेडगाकडे जात होते. श्रीमंत भोगले यांच्या शेताजवळ सुनिल तानवडे यांनी त्यांच्या मोटरसायकलला मागून धडक दिली. या अपघातात रज्जाक अत्तार गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
हिना रज्जाक अत्तार (वय 22) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात सुनिल तानवडे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 281, 125(ब) 106(1), सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शिराढोण: ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू
शिराढोण येथे निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उत्रेश्वर साहेबराव शवाळ (रा. आवाडशिरपुरा, ता. कळंब, जि. धाराशिव) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
28 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता उत्रेश्वर शवाळ त्यांच्या मोटरसायकलवरून जात होते. दरम्यान, एमएच 44 एस 3180 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांच्या मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात उत्रेश्वर शवाळ गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
जयश्री उत्रेश्वर शवाळ (वय 35) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम 281, 106 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नळदुर्गजवळ मोटरसायकलच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
नळदुर्गजवळ एका निष्काळजी मोटरसायकल चालकाने पादचाऱ्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. विश्वनाथ शंकर कांबळे (वय 55, रा. वत्सलानगर, अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
1 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11.30 वाजता विश्वनाथ कांबळे अणदूर-सोलापूर महामार्ग 65 वर, बाबा हॉटेलसमोर, अणदूर शिवारातून पायी चालले होते. त्याच वेळी एमएच 25 बीडी 0177 या क्रमांकाच्या मोटरसायकल चालकाने निष्काळजीपणे आणि वेगात वाहन चालवून त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात विश्वनाथ कांबळे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
ज्योतीबा विश्वनाथ कांबळे (वय 30) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात मोटरसायकल चालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम 281, 106(1), सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.