धाराशिव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा फेडरेशनवर आपला झेंडा फडकावला आहे. 14 जागांपैकी तब्बल 11 जागांवर विजय मिळवत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपळा साप करत दणदणीत वर्चस्व सिद्ध केलं आहे. महाविकास आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलं.
राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक नुकतीच पार पडली. सुरुवातीला चार जागा बिनविरोध निवडण्यात आल्या होत्या, मात्र उर्वरित नऊ जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात उतरले होते. आज जाहीर झालेल्या निकालानुसार या नऊ जागांपैकी नऊही जागांवर महायुतीने बाजी मारली, तर महाविकास आघाडीला केवळ एकच जागा मिळाली.
गेल्या अनेक वर्षांपासून महायुतीच्या ताब्यात असलेले जिल्हा मजूर फेडरेशन पुन्हा एकदा महायुतीकडेच गेले आहे. या निवडणुकीत महायुतीकडून राणा जगदीशसिंह पाटील, आमदार तानाजी सावंत आणि आमदार सुजितसिंह ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर महाविकास आघाडीच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी नेतृत्व केलं होतं. मात्र निकालांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.