• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम: वंजारवाडीत विद्युत रोहित्रावर काम करताना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

 महावितरणविरोधात ग्रामस्थांचा संताप

admin by admin
April 7, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
भूम: वंजारवाडीत विद्युत रोहित्रावर काम करताना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
0
SHARES
305
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम – तालुक्यातील वंजारवाडी येथील तरुण शेतकरी बालाजी भालचंद्र जगदाळे  यांचा शनिवारी दुपारी विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील विद्युत रोहित्रावर काम करत असताना दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते खाली कोसळले.

घटनेनंतर त्यांना तातडीने भूम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दुर्दैवाने, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर वंजारवाडीतील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. बालाजी यांच्या मृत्यूला महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बालाजी यांचा मृतदेह भूम येथील महावितरणच्या कार्यालयात आणून ठेवला. यावेळी महावितरणचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच वाढला.

परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरण कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मृत्यूला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. अखेर, रात्री उशिरा सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह वंजारवाडी येथे नेला.

रविवारी (दिनांक ६ एप्रिल रोजी) सकाळी बालाजी जगदाळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बालाजी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे वंजारवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

Previous Post

जिल्हा नियोजन कामांना स्थगितीवरून आता महायुतीतच फाटाफूट?

Next Post

तुळजापूर सट्टा प्रकरण तापलं! राजाभाऊ माने यांनी केली चौकशीची मागणी!

Next Post
तुळजापूर सट्टा प्रकरण तापलं! राजाभाऊ माने यांनी केली चौकशीची मागणी!

तुळजापूर सट्टा प्रकरण तापलं! राजाभाऊ माने यांनी केली चौकशीची मागणी!

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या 139 गावांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार

July 23, 2026
“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!