धाराशिव: मराठा जन आक्रोशच्या नावावर अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या आशिष विसाळचा ‘खंडणीचा धंदा’ अखेर ठेचकाळला! स्वतःला आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून मिरवणाऱ्या या ठगाला मराठा आंदोलकांनी भर चौकात तुडवून आनंद नगर पोलीस ठाण्यात सुपूर्द केले. पोलिसांनाही ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळाल्याने त्यांनी लगेचच त्याच्या फोन कॉल्स आणि बँक खात्याची चौकशी सुरू केली.
विसाळचा ‘खंडणीखोरी प्लॅन’ कसा उघडकीस आला?
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “आमदार धस साहेबांचं फर्मान आहे!” असं सांगत महिन्या-महिन्याला पैसे उकळणारा विसाळ हा ‘मराठा जन आक्रोश’च्या नावावर पावतीबुक घेऊन फिरायचा. ज्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांना थेट आमदारांच्या नावे धमकी! “तुमची चौकशी लावतो! धस साहेबांना सांगतो!” असा दम भरत लाखोंचा गोडाऊन भरला.
मात्र, मराठा आंदोलकांना याचा ‘गंध’ लागताच त्यांनी आधी गुप्त तपास सुरू केला. अनेक अधिकाऱ्यांनी विसाळला पैसे दिल्याची कबुली दिल्यानंतर या ‘जन आक्रोश’वाल्यांनी खरोखरचा ‘आक्रोश’ केला आणि विसाळला चांगलाच गरम गरम हिशोब लावला!
‘चौकात’ हिसका, ‘ठाण्यात’ तक्रार आणि ‘धस’ यांचा ‘तुडवण्याचा’ आदेश!
चौकात जोरदार तुंबळ घडल्यानंतर आंदोलकांनी विसाळला पोलीस ठाण्यात नेऊन आमदार सुरेश धस यांना फोन लावला. विसाळच्या ‘गुन्हेगारी’ इतिहासाची माहिती मिळताच आमदार धस संतापले. “त्याला सोडायचं नाही! फोन आणि बँक डिटेल्सची चौकशी करा!” असं पोलिसांना सांगितलं. त्याही पुढे जात “येताना त्याला ६ फेब्रुवारीला आष्टीला घेऊन या, मी त्याला कसा तुडवतो ते पहा!” अशी ‘जाहीर धमकी’ही त्यांनी दिली.
विसाळसाठी ‘तुडवणीयंत्र’ लोड होतंय!
सध्या आनंद नगर पोलीस विसाळच्या कॉल आणि बँक खात्यांची तपासणी करत आहेत. त्याच्या ‘खंडणी बिझनेस’च्या संपूर्ण आकडेमोडीनंतर आष्टीत आमदार धस यांचा ‘तुडवणी कार्यक्रम’ सुरू होणार आहे! आता फक्त प्रश्न एवढाच आहे की विसाळने ‘सेफ्टी गियर’ विकत घ्यावा का सरळ पोलीस संरक्षणाची मागणी करावी?