वाशी तालुक्यात सरमकुंडी शिवारातील एव्हर रिन्यु एनर्जी प्रा.लि. कंपनीच्या पवनचक्की लोकेशन्समधून कॉपर केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अंदाजे 1,45,000 रुपये किमतीचे केबल चोरीला गेल्याची माहिती कंपनीचे प्रतिनिधी विनोद रामचंद्र गालफाडे यांनी पोलिसांना दिली आहे.
पहिली घटना 12 एप्रिल 2024 रोजी लोकेशन नंबर न्यू 11 येथे घडली. त्यानंतर 10 जून 2024 रोजी दुपारी 3:15 वाजता लोकेशन नंबर एसटीआर 64 येथे आणि 18 जून 2024 रोजी रात्री 12:45 वाजता लोकेशन नंबर न्यू 10 येथे अशा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरी झाली.
या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 379 (चोरी) आणि 427 (दुखापत) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.
वाशी येथे शेतकर्यांचे केबल चोरी
वाशी तालुक्यातील यशवंडी शिवारात एका शेतकर्यांच्या शेतातील केबल चोरीची घटना घडली आहे. गणेश अंगद खोसे (३९) यांच्या शेतातून अज्ञात व्यक्तींनी १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ९०० मीटर केबल चोरून नेली. या केबलची अंदाजे किंमत ४५,००० रुपये आहे. खोसे यांनी २२ ऑगस्ट रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.