लोहारा – कानेगाव येथे शेतातील बांध कोरण्याच्या वादातून एका महिलेला गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना दि. १ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता घडली. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिहानाबी महमद इनामदार (वय ५०, रा. कानेगाव) या महिलेला हबीब बाबुद्दीन इनामदार, अलीम हबीब इनामदार, मालन बी अमीन इनामदार, राशिदबी हबीब इनामदार (सर्व रा. कानेगाव) यांनी शेत गट क्रमांक ५९/९ मध्ये शेतातील बांध कोरण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.
रिहानाबी इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.