कळंब: कळंब तालुक्यातील तांदुळवाडी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील काही महिलांनी कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या सचिव सविता सचिन डिकले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिकले यांनी महिलांकडून पैसे व सोने घेऊन त्यांची फसवणूक केली, तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप महिलांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर डिकले यांनी महिलांच्या घरात जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या गंभीर आरोपांनंतर तांदुळवाडीतील महिलांनी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत महिलांनी म्हटले आहे की, सविता डिकले यांनी त्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला. त्यांनी दवाखान्याचे कारण सांगून महिलांकडून हातउसन्या रक्कमेची मागणी केली. अनेक महिलांनी त्यांना मदत म्हणून पैसे व सोने दिले. मात्र, नंतर डिकले यांनी पैसे व सोने परत करण्यास नकार दिला.
याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलांना डिकले यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच, ‘तुमच्या कुटुंबाला संपवून टाकू’ अशी धमकी दिली, असा आरोप महिलांनी केला आहे. यापूर्वीही डिकले यांनी महिलांच्या घरात हळद, कुंकू, लिंबू आणि सुया लावल्याचा आरोप आहे. २२ जानेवारी २०२५ रोजी मधुमंजीली संदीप काळे यांच्या घरातही अशाच प्रकारे जादूटोणा करण्यासाठी वस्तू सापडल्या होत्या.
या सर्व प्रकारानंतर त्रस्त झालेल्या महिलांनी पोलिसात धाव घेतली आहे. त्यांनी सविता सचिन डिकले, सचिन पांडुरंग डिकले आणि त्यांच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही महिलांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे तांदुळवाडी गावात खळबळ उडाली आहे. महिला बचत गटाच्या सचिवावर केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणाचा सत्य काय आहे, हे पोलिसांच्या तपासात लवकरच समोर येईल अशी शक्यता आहे.
बचत गटाच्या महिलांना लाखोंचा गंडा – काळी जादू, लिंबू-सुया आणि पोलिसांचा ‘सरबत सल्ला’!
गावातल्या महिलांनी कष्टाने पैसे वाचवले, ते विश्वासाने बचत गटाच्या सचिवाकडे दिले, आणि आता त्यांना परतफेडीऐवजी घरासमोर लिंबू-सुया आणि राख मिळतेय! तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांनीही भन्नाट सल्ला दिला – “लिंबू सरबत करून प्या!”
कोण फसले, किती फसले?
या प्रकरणात अनेक महिलांनी लाखोंची बचत गमावली आहे. त्यातील प्रमुख पीडित महिला आणि त्यांच्या फसवणुकीचा आकडा असा आहे:
- शीला चंद्रकांत डिकले – ₹1,00,000
- मधुसुनिता संदीप काळे – ₹2,50,000
- धनश्री रमेश पवार – ₹1,00,000
- सुमन बापूराव भालेकर – ₹50,000
- सिंधु किसन माने – ₹80,000
- अनुसया पांडुरंग डिकले – ₹55,000
- सविता श्रीराम काळे – ₹20,000
कोण आहेत ‘लिंबू-सुया’ मास्टरमाइंड?
या फसवणुकीमागे काही संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे. हेच लोक महिलांच्या पैशांवर हात मारून त्यांना काळी जादूची भीती दाखवत होते:
- श्रीकांत बाबुराव माने – भोंदूबाबा/आरमोळी
- भैय्या महाराज – आध्यात्मिक ‘बिझनेसमन’
- समर्थ ज्वेलर्स (प्रोप्रा. भोस) – पैसे गुंतवणुकीत हात
- सचिन पांडुरंग डिकले – मुख्य आरोपी
- सुनिता सचिन डिकले (मो. 8010073457 / 9022827932)
- ज्योती निलेश कोठावळे (लातूर) (मो. 9765394192)
- निलेश कोठावळे – संशयित गुंतवणूकदार
Video