येरमाळा – वडजी येथे शेतात काम करत असताना आग्या मोहोळ उठल्याने दशरथ सदाशिव जाधवर (६०) यांचा मृत्यू झाला, तर चंद्रकला दशरथ जाधवर (५५) आणि शांता चंद्रकांत मोराळे (५८) या दोन महिला जखमी झाल्या आहेत.
शुक्रवारी (दि. १४) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. दशरथ जाधवर हे विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. ते नेहमी दुचाकीवरून जात असत, परंतु यावेळी ते पायी गेले होते. त्याचवेळी आग्या मोहोळ उठले आणि माश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना बचाव करता आला नाही आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात जखमी झालेल्या चंद्रकला दशरथ जाधवर आणि शांता चंद्रकांत मोराळे यांना पुढील उपचारांसाठी कळंब येथील जाधवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तुळसाबाई विनायक जाधवर आणि लता श्रीराम जाधवर यांना मात्र प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.